5 कोटींच्या गाडीचे पोलिसांनी कापले 5 हजारांचे चालान, जाणून घ्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 11:34 AM2022-02-06T11:34:24+5:302022-02-06T11:45:53+5:30

पोलिस लॅम्बोर्गिनी कारचे चालान कापत होते, तेव्हा रस्त्यावर कारला पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली.

Police cut off Rs 5 crore challan for Rs 5,000 vehicle, find out the case | 5 कोटींच्या गाडीचे पोलिसांनी कापले 5 हजारांचे चालान, जाणून घ्या प्रकरण

5 कोटींच्या गाडीचे पोलिसांनी कापले 5 हजारांचे चालान, जाणून घ्या प्रकरण

Next

जयपूर: अमेरिका-दुबईसारख्या देशांमध्ये सुपरकार अनेकदा पाहायला मिळतात. पण, भारतात अशाप्रकारच्या कार क्वचितच दिसतात. अशी एखादी सुपर कार दिसल्यावर बघ्यांची गर्दी जमते. जयपूरमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. जयपूरमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी चालान कापण्यासाठी एका सुपर कारला थांबवले. ही कार थांबताच तिला पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली. 

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील एका मोठ्या व्यावसायिकाचा मुलगा नंबर प्लेन नसलेली 5 कोटींची लॅम्बोर्गिनी कार चालवत होता. यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी त्याला पकडले आणि 5 हजार रुपयांचे चालान कापले. घटनास्थळी तैनात हेड कॉन्स्टेबल सुलतान सिंग यांनी मोटार व्हेईकल अॅक्टनुसार चालान कापले आणि त्या तरुणाला गाडीला नंबर प्लेन लावून घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रस्त्यावर थांबलेली सुपर कार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली.

रस्त्यावर ट्रॅफिक जाम
पोलिस चालान कापण्यात व्यस्त होते, यादरम्यान 5 कोटींची ही आलिशान कार पाहण्यासाठी आणि कारसोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले. चालनादरम्यान गाडी 15 मिनिटे रस्त्यावर उभी राहिली आणि यादरम्यान फोटो काढणाऱ्यांच्या गर्दीमुळे रस्ता जाम झाला. यानंतर वाहतूक पोलिसांनी लोकांना तेथून हटवले. दरम्यान, ही 5 कोटींची कार राष्ट्रीय नेमबाज आणि जयपूरचे उद्योगपती विवान कपूर यांची असल्याचे सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Police cut off Rs 5 crore challan for Rs 5,000 vehicle, find out the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.