आप-पोलिसांमध्ये रॅलीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून जुंपली
By Admin | Updated: April 24, 2015 02:16 IST2015-04-24T02:16:40+5:302015-04-24T02:16:40+5:30
भूसंपादन कायद्याच्या विरोधात बुधवारी जंतर मंतरवर आयोजित रॅलीत राजस्थानच्या गजेंद्र सिंग कल्याणवत या शेतकऱ्याने झाडावर गळफास लावून केलेल्या आत्महत्येवरून दिल्लीत सत्तेवर असलेली आम आदमी पार्टी

आप-पोलिसांमध्ये रॅलीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येवरून जुंपली
नवी दिल्ली : भूसंपादन कायद्याच्या विरोधात बुधवारी जंतर मंतरवर आयोजित रॅलीत राजस्थानच्या गजेंद्र सिंग कल्याणवत या शेतकऱ्याने झाडावर गळफास लावून केलेल्या आत्महत्येवरून दिल्लीत सत्तेवर असलेली आम आदमी पार्टी आणि दिल्ली पोलीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या दोघांनीही गजेंद्र सिंगच्या आत्महत्येचे खापर एकमेकांवर फोडले आहे. दिल्ली सरकारने या घटनेच्या दंडाधिकारीय चौकशीचा आदेश दिला, तर तसे करण्याचा सरकारला अधिकारच नाही, असा पलटवार दिल्ली पोलिसांनी केला आहे.
रॅलीच्या वेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस निरीक्षक एस.एस. यादव यांनी दोन पानी एफआयआर नोंदविला. आप कार्यकर्त्यांनी गजेंद्रला आत्महत्या करण्यास उद्युक्त केले, असा आरोप त्यात केला आहे.