तांबापुरात पोलिसांचे कोम्बीग ऑपरेशन
By Admin | Updated: March 22, 2016 00:41 IST2016-03-22T00:41:05+5:302016-03-22T00:41:05+5:30
जळगाव : आगामी काळात येणारे सण व उत्सव लक्षात घेता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागांमध्ये कोम्बीग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी केल्या आहेत. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तांबापुरा भागात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्यावतीने ही मोहीम राबवण्यात आली.

तांबापुरात पोलिसांचे कोम्बीग ऑपरेशन
ज गाव : आगामी काळात येणारे सण व उत्सव लक्षात घेता प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील भागांमध्ये कोम्बीग ऑपरेशन राबवण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी केल्या आहेत. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तांबापुरा भागात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्यावतीने ही मोहीम राबवण्यात आली.तांबापुरा भागात असणार्या फुकटपुरा, पंचशीलनगर, टीपू सुलतान चौक या संवेदनशील भागांमध्ये कोम्बीग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुनील कुर्हाडे, सहायक पोलीस निरीक्षक आर.पी. धारबडे, एस.ए. बागुल यांच्यासह तीन ते चार पोलीस उपनिरीक्षक, २० ते २२ पोलीस कर्मचारी, एक दंगा नियंत्रक पथक व एक श्वानपथक सहभागी झाले होते. कोम्बीग दरम्यान परिसरातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. तासभर ही मोहीम सुरू होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.