खंडणी प्रकरणातील चौदा संशयितांना पोलीस कोठडी

By admin | Published: May 14, 2014 01:04 AM2014-05-14T01:04:01+5:302014-05-14T01:08:40+5:30

नाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी सोमवारी अटक केलेल्या १४ संशयितांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या २८ झाली आहे़ सराईत गुन्हेगार भीम पगारे याने ९ मे रोजी व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केली होती़ या संशयितांना न्यायालयात आणताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

Police closet fourteen suspects in the ransom case | खंडणी प्रकरणातील चौदा संशयितांना पोलीस कोठडी

खंडणी प्रकरणातील चौदा संशयितांना पोलीस कोठडी

Next

नाशिक : व्यावसायिकाकडून ७० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी सोमवारी अटक केलेल्या १४ संशयितांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांची संख्या २८ झाली आहे़ सराईत गुन्हेगार भीम पगारे याने ९ मे रोजी व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केली होती़ या संशयितांना न्यायालयात आणताना मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़
व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी रविवारी भद्रकाली पोलिसांनी १४ आरोपींना अटक केली होती़ त्यांना न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती़ यानंतर याच गुन्‘ात भद्रकाली पोलिसांनी सोमवारी संशयित मनोज किशोर वाघ, अश्पाक फ किम मणियार, रवींद्र नारायण आवटे, सचिन रवींद्र पगारे, नंदन पाईकराव, जितेंद्र अशोक चौधरी, पंकज भाऊसाहेब भांबळे, संदीप गोपीचंद दोंदे, संतोष जीवन भुजबळ, सोहेल रफि क शेख, आनंद गुरुबच्चीतसिंग घडवाल, योगेश अशोक गांगुर्डे, विशाल विलास मैड, अरिफ लियाकत पठाण या संशयितांना अटक केली आहे़ या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Police closet fourteen suspects in the ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.