शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टरची गर्लफ्रेंड ते देहविक्रयाच्या रॅकेटची सूत्रधार... सोनू पंजाबन कायद्याच्या कचाट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 16:32 IST

या चौघांना मारण्यात सोनू पंजाबनचाच हात असल्याची चर्चा आहे.

नवी दिल्ली: हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप असणाऱ्या सोनू पंजाबन आणि तिचा सहकारी संदीप याच्याविरोधात मंगळवारी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी षडयंत्र, पॉक्सो या गुन्ह्यांची कलमे लावण्यात आली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून देहविक्रयाच्या व्यवसायामुळे सोनू पंजाबनचे नाव सातत्याने चर्चेत होते. सोनू पंजाबन ही सुरूवातीला स्वत: शरीरविक्रय करत असे. तिचे मूळ नाव गीता अरोरा असे आहे. एका व्यापाऱ्याचा मृतदेह तिच्या गाडीत मिळाल्यानंतर सोनू पंजाबन सर्वप्रथम चर्चेत आली होती. मात्र, त्यावेळी तिच्याविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्यामुळे तिची सुटका झाली होती. त्यानंतर तिची मैत्री रोहतकमधील विजय या गुन्हेगाराशी झाली. या दोघांनी लग्नही केले होते. त्यानंतर विजय पोलिसांबरोबरच्या एका चकमकीत मारला गेला होता. त्यानंतर सोनूचे दीपक या गुन्हेगाराशी संबंध होते. तोदेखील आसाममध्ये झालेल्या पोलीस चकमकीत मारला गेला. यानंतर सोनूचे सूत दीपकचा भाऊ हेमंत उर्फ बंटी याच्याशी जुळले. गुन्हेगारी विश्वात हेमंतची प्रचंड दहशत होती. याच काळात सोनूने आपल्या देहविक्रयाच्या व्यवसायाचे जाळे पसरले. दरम्यानच्या काळात हेमंत हादेखील एका पोलीस चकमकीत मारला गेला. त्यानंतर सोनूने अशोक उर्फ बंटी याचा हात धरला. कालांतराने सोनूच्या इतर तीन नवऱ्यांप्रमाणे तोदेखील पोलीस चकमकीत ठार झाला. त्यामुळे या चौघांना मारण्यात सोनू पंजाबनचाच हात असल्याची चर्चा आहे. मात्र, दरम्यानच्या काळात सोनूने आपल्या देहविक्रयाच्या व्यवसायाचे जाळे मोठ्याप्रमाणावर पसरले होते. तिच्या नावे अनेक मालमत्ता असून ती कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास नेहमीच चर्चेचा विषय ठरला. उंची राहणीमान आणि बिनधास्त स्वभावासाठी सोनू पंजाबन ओळखली जाते. सेक्स रॅकेटच्या गुन्ह्यात पकडल्यानंतर आरोपी मुलींना ज्यावेळी न्यायालयात हजर केले जाते तेव्हा या मुली शक्यता प्रसारमाध्यमांसमोर चेहरा लपवताना दिसतात. मात्र, सोनू पंजाबन प्रसारमाध्यमांसमोर आपला चेहरा लपवायची नाही. तिला टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये स्वत:चे फोटो बघायला आवडायचे. काही वर्षांपूर्वी आलेल्या फुकरे चित्रपटातील भोली पंजाबन हे पात्र सोनूशी मिळतीजुळते असल्याचेही म्हटले जाते. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाPoliceपोलिसCrimeगुन्हा