शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नूंह हिंसाचार : पोलीस सर्वांचे संरक्षण करू शकत नाहीत; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 19:26 IST

Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला. 

Haryana CM Manohar Lal Khattar on Nuh Violence : हरयाणातील नूह जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराने आतापर्यंत ६ जणांचा जीव घेतला. कित्येक वाहने जाळली गेली, शेकडो दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून या हिंसाचाराच्या आगीत अनेकांचे लाखोंचे नुकसान झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने देखील या हिंसाचारावर तातडीने सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच हरयाणाचेमुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे एक विधान चर्चेत आहे. पोलीस सर्वांना संरक्षण देऊ शकत नाहीत, असे खट्टर यांनी म्हटले आहे. बुधवारी चंदीगडमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, राज्याची लोकसंख्या २.७ कोटी आहे. आमच्याकडे ६० हजार जवान आहेत. अशा परिस्थितीत पोलीस प्रत्येक व्यक्तीचे संरक्षण करू शकत नाहीत. एखाद्या जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीकडून हिंसाचाराच्या स्थितीत असे बोलणे अत्यंत वादग्रस्त असल्याची टीका विरोधक करत आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे हिंसाचारात बळी पडलेल्यांचे मनोबल खचले आहे, अशा तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

दोषींना सोडणार नाही - मुख्यमंत्री मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात कोणतीही बेकायदेशीर कामे होऊ नयेत यासाठी २० निमलष्करी दल तैनात करण्यात आली आहेत. ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ पोलीस कर्मचारी आणि ४ नागरिकांचा समावेश आहे. तर, ११६ जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य ९० जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर कारवाई केली जाईल. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. भारतीय राखीव बटालियनही नूहमध्ये तैनात करण्यात येणार असल्याचे खट्टर यांनी सांगितले. 

टॅग्स :HaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस