शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हरयाणात शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार; अनेकांची डोकी फुटली, विरोधकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 09:17 IST

कारवाईच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले.

- बलवंत तक्षक चंदीगढ : हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा मतदारसंघ कर्नालमध्ये बसताडा टोलनाक्यावर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. यात भाजपच्या नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटली आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ठिय्या मांडून रस्ते रोखून धरले तर विरोधी पक्षांची सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

या कारवाईच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले. नंतर शेतकऱ्यांनी तत्काळ हिसार-दिल्ली मार्गावरील टोलनाक्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. यासोबत जिंद चौक, बसताडा टोलनाका, रोहतक येथील मकडौली टोलनाका, नरवानामधील बद्दोवाल टोलनाका, कैथलमधील तितरम चौक, पटियाला मार्गावर ठिकाणी शेतकऱ्यांनी ठाण मांडले. अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यांच्या मघोमध बसले. अनेक ठिकाणी वाहतूक इतर मार्गाने वळवावी लागली.  

करनालचे उपजिल्हाधिकारी निशांत यादव म्हणाले की, सुरुवातील शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऐकण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीमार केला. यात काही शेतकरी तसेच पोलिसांनाही इजा झाली आहे. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करनालमध्ये होणार असलेल्या भाजपच्या बैठकीला विरोध करण्याचा इशारा आधीच दिला होता. हे लक्षात घेता करनालमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. कारवाईच्या निषेधार्थ भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी शेतकऱ्यांना सर्व रस्ते आणि टोलनाक्यांवर ठिय्या मारण्याचे आवाहन केले.

चौकशीची मागणी 

काँग्रेस नेते राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी तसेच राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवावला यांनीहा या लाठीचार्जबाबत सरकाराचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.  माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांनीही लाठीमारीचा निंदा केली आहे. ते म्हणाले की, सरकार लाठ्या व बंदुकीच्या सहाय्याने नाही तर परस्पर सहमतीने चालवले पाहिजे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनखड़ म्हणाले की, पोलिसांनी कोणत्या परिस्थितील लाठीचार्ज केला याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. 

टॅग्स :FarmerशेतकरीPoliceपोलिसHaryanaहरयाणा