महापालिका निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात
By Admin | Updated: February 20, 2017 19:53 IST2017-02-20T19:53:09+5:302017-02-20T19:53:09+5:30
महापालिका निवडणुकीसाठी रविवारी पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

महापालिका निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी रविवारी पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस ठाणेनिहाय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ महापालिकेसाठी मंगळवारी (दि़२१) प्रत्यक्ष मतदान होत असून, यासाठी शहरात ५४८ केंद्रे, तर एक हजार ४०८ मतदान केंदे्र आहेत़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या शहरातील मतदान केंद्रांची संवेदनशील, अतिसंवेदनशील व क्रिटिकल या तीन स्वरूपात विभागणी करण्यात आली आहे़
महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होत असून, त्यामध्ये शहरातील नाशिकरोड, देवळाली कॅम्प, सातपूर व आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे़ यामध्ये ३२ गावांचा समावेश असून, या ठिकाणी ३२ मतदान केंदे्र व ६७ कार्यालये आहेत़ दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे़
-----------
नाशिक शहरातील पोलीस बंदोबस्त
* सहायक पोलीस आयुक्त: ६
* पोलीस निरीक्षक : २८
* पोलीस उपनिरीक्षक : ४४
* पोलीस कर्मचारी : १०४०
* महिला पोलीस कर्मचारी : ४९
अतिरिक्त पोलीस बंदोबस्त
* सहायक पोलीस आयुक्त : १०
* पोलीस निरीक्षक : २०
* पोलीस उपनिरीक्षक : २५
* पोलीस कर्मचारी : ७००
* होमगार्ड (पुरुष) : १५००
* होमगार्ड (महिला) : २००
* एसआरपीएफ कंपनी : १
इतर विभागाकडून मागविलेला पोलीस बंदोबस्त
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी : १०० पोलीस कर्मचारी
पीव्हीआर - ५० पोलीस कर्मचारी
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : ५० पोलीस कर्मचारी
धुळे : ४५० पोलीस कर्मचारी