विषारी दारुची जळगावात दोघांना बाधा
By Admin | Updated: January 18, 2016 00:22 IST2016-01-18T00:16:43+5:302016-01-18T00:22:21+5:30

विषारी दारुची जळगावात दोघांना बाधा
जळगाव: गावठी दारु प्राशन केल्याने शहरातील गेंदालाल मील भागात रघुनाथ तुकाराम काकडे (वय ६४ रा.कठोरा, ता.जळगाव) यांच्यासह अन्य एका जणाला विषबाधा झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. काकडे यांना बेशुध्दावस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसर्या एका जणाने खासगी रुग्णालयात उपचार घेतले.