घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी

By Admin | Updated: September 19, 2014 03:20 IST2014-09-19T03:20:33+5:302014-09-19T03:20:33+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधत ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले.

The point of intrusion is at the center | घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी

घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी

नवी दिल्ली : भारत-चीनच्या शिखर बैठकीवर लडाखमध्ये अलीकडे चीनने केलेल्या घुसखोरीच्या मुद्याचे सावट राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर चीनकडून वारंवार होत असलेल्या उल्लंघनाकडे लक्ष वेधत ही गंभीर चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट केले. सीमावादावर त्वरित तोडगा काढण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 भारत भेटीवर आलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत मोदींची झालेली शिखर बैठक चिनी लष्कराकडून भारताच्या हद्दीत होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्यावर केंद्रित राहिली. सीमेवर शांतता आणि सलोखा कायम राखण्याबाबत दोन देशांमध्ये झालेल्या कराराचे कटाक्षाने पालन केले जावे, असेही मोदींनी स्पष्ट केले. 
बुधवारी अहमदाबाद येथील साबरमतीच्या किनारी जिनपिंग यांचे जोरदार स्वागत झाल्यानंतर दुस:या टप्प्यात गुरुवारी नवी दिल्लीत दोन नेते आणि शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा तीन तास चालली. येत्या पाच वर्षात चीनने भारतात 2क् अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जिनपिंग भारत दौ:यावर असताना बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी चिनी लष्कराने भारताच्या चुमार आणि डेमचोक भागात घुसखोरी कायम ठेवल्याने हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. अहमदाबाद येथे बुधवारी चर्चेतही मोदींनी चिनी कुरापतींचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र सरकारने ही सदिच्छा चर्चा असल्याचे सांगत  अधिकृतरीत्या भाष्य टाळले होते. 
सीमेवर वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या घटनांबद्दल मी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संबंध पूर्ण क्षमतेने बळकट करण्यासाठी परस्पर विश्वास आवश्यक असून, सीमेवर शांतता आणि सलोखा राखणो हाच परस्पर विश्वासाचा पाया आहे. आमचे सीमेसंबंधी करार तसेच विश्वासनिर्मितीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने काम करीत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत (एलएसी) स्पष्टता आल्यास शांतता आणि सलोखा राखण्याच्या प्रयत्नांत मोठे योगदान लाभेल. मी जिनपिंग यांना सीमाप्रश्नी लवकर तोडगा काढण्याचे 
आवाहन केले आहे, असे मोदींनी 
चिनी अध्यक्षांच्या उपस्थितीत पत्रकारांना सांगितले. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
तोडग्यासाठी चीन कटिबद्ध..
च्सीमा अद्याप निश्चित नसल्यामुळे काही वेळा अशा घटना घडतात. सीमेसंबंधी यंत्रणा पाहता दोन्ही देश विविध स्तरावर प्रभावीरीत्या कृती करण्याची क्षमता ठेवतात. त्यामुळे अशा घटनांचा द्विपक्षीय संबंधावर परिणाम होणार नाही. सीमाप्रश्न लवकर निकाली काढण्यासाठी भारतासोबत मित्रत्वाच्या नात्याने सल्लामसलत करण्यास चीन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शी यांनी दिली.  दुस:या दिवशी दोन देशांदरम्यान 12 करार झाले असून त्यात भारतात चिनी औद्योगिक पार्कची उभारणी, रेल्वेत गुंतवणूक यासारखे महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे.
 
हैदराबाद हाऊसबाहेर तिबेटींची निदर्शने..
मोदी आणि शी यांची चर्चा सुरू असलेल्या हैदराबाद हाऊसबाहेर तिबेटींनी निदर्शने केली. त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याने तणाव निर्माण झाला.

 

Web Title: The point of intrusion is at the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.