शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पीएनबी घोटाळा: नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे आयकर अधिकारी सीबीआयच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 17:08 IST

चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीच चौकशी होणार

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणेकडून आता नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणाऱ्या आयकर विभागाच्या आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. याशिवाय केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष सुशील चंदा यांचीही चौकशी होणार आहे. सुशील चंद्रा मे महिन्याच्या अखेरपर्यंत निवृत्त होणार आहेत. मात्र चौकशी सुरू करायची असल्यानं त्यांना अद्याप निवृत्तीबद्दल कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.  पीएनबी कर्ज घोटाळा समोर आल्यानंतर आयकर विभागानं नीरव मोदीच्या शोरुम आणि घरांवर धाडी टाकल्या. यावेळी नीरव मोदीनं केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती अधिकाऱ्यांच्या हाती लागली. मात्र आयकर विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहारांची चुकीची आकडेवारी अहवालात दिली, अशी माहिती अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी दिली. नीरव मोदीच्या संपत्तीचं मूल्यांकनदेखील चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं. पीएनबी घोटाळा प्रकरणाचा तपास करताना ही बाब सीबीआयच्या लक्षात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएनबी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयच्या मुख्यालयाला दिलीच नाही. याशिवाय सीबीआयचा एक वरिष्ठ अधिकारीही रडारवर आहे. याच तपासाचा भाग म्हणून सीबीआयच्या पथकानं सोमवारी मुंबईत येऊन आयकर विभागाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतलं. सीबीआयनं नीरव मोदी प्रकरणात 14 मे रोजी सीबीआय न्यायालयात पहिलं आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये नीरव मोदीसह 24 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. यामध्ये अलाहाबाद बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रमण्यम यांच्या नावाचाही समावेश आहे.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीIncome Taxइन्कम टॅक्सCBIगुन्हा अन्वेषण विभाग