शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पीएनबीला चुना लावणारा नीरव मोदी परदेशी बँकांचं कर्ज फेडायला तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:07 PM

एचएसबीसी आणि आयडीबीचं कर्ज फेडण्याची नीरवची तयारी

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी अद्याप भारतीय यंत्रणांच्या हाती लागलेला नाही. पीएनबीमधील घोटाळा बाहेर येताच नीरवच्या देशातील मालमत्तांवर टाच आणण्यात आली. त्यानंतर नीरव मोदीनं आपली बदनामी झाल्याचा कांगावा करत बँकांचं कर्ज फेडण्यास नकार दिला. भारतीय यंत्रणांच्या कारवाईमुळे आपलं नुकसान झाल्यानं कर्जाची परतफेड करु शकत नाही, असं म्हणत नीरवनं हात वर केले. भारतीय बँकांचं कर्ज फेडण्यास नकार देणारा नीरव परदेशी बँकांचं कर्ज फेडण्यास तयार झाला आहे. अमेरिकेच्या एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँकेनं नीरव मोदीला कर्ज दिलं होतं. या बँकांनी नीरव मोदीविरोधात न्यूयॉर्कमधील न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयानं नीरवच्या कंपन्यांना बँकांचं कर्ज फेडण्याच्या सूचना केल्या. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन कंपन्यांकडून देण्यात आलं आहे. न्यूयॉर्कमधील आयडीबीनं (इस्रायल डिस्काऊंट बँक) नीरवच्या तीन कंपन्यांना 2013 मध्ये 1 कोटी 20 लाख डॉलरचं कर्ज दिलं होतं. तर एचएसबीसीनं 2008 मध्ये 1 कोटी 60 लाख डॉलरचं कर्ज दिलं होतं. नीरव मोदीनं एचएसबीसी आणि इस्रायल डिस्काऊंट बँकेकडून घेतलेलं कर्ज त्याच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. नीरव मोदीच्या कंपन्यांची मालमत्ता ताब्यात घेऊन कर्जवसुली केली जाणार आहे. यासाठी काही मालमत्तादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतीय यंत्रणांनी टाच आणलेल्या मालमत्तांचा समावेश आहे की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पीएनबीला तब्बल 13 हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप नीरववर आहे.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक