शहरं
Join us  
Trending Stories
1
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
2
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
3
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
4
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
5
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
6
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
7
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
8
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
9
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
10
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
11
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
12
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
13
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
14
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
15
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
16
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
17
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
18
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
19
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
20
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?

मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 14:31 IST

बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या, आता तो बेल्जियम पोलिसांच्या ताब्यात आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने बेल्जियम सरकारला एका पत्राद्वारे मेहुल चोक्सीला ताब्यात घेण्यासाठी औपचारिक आश्वासने दिली आहेत. जर चोक्सीला भारतात आणले तर त्याला अमानुष वागणूक दिली जाणार नाही. त्याशिवाय त्याला मेडिकलसह १४ सुविधा पुरवल्या जातील असं भारताने बेल्जियमला सांगितले आहे.

गृह मंत्रालयाने सांगितले आहे की, मेहुल चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधील बॅरेक नंबर १२ मध्ये ठेवले जाईल. या कोठडीत ६ लोकांच्या राहण्याची क्षमता आहे. पत्र पाठवेपर्यंत बॅरेकमधील २ कोठडी रिकामी करण्यात आली होती. पळपुटा उद्योगपती मेहुल चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय तपास यंत्रणेच्या प्रत्यार्पणाच्या आवाहनावर १२ एप्रिलला चोक्सीला अटक झाली. या प्रकरणात तो आणि त्याचा भाचा नीरव मोदी प्रमुख आरोपी आहेत. 

आर्थर रोड जेलमध्ये काय काय सुविधा मिळणार?

  • गर्दीपासून वेगळी असलेली १२ नंबरची कोठडी
  • २० बाय १५ ची जेलमध्ये स्वतंत्र कोठडी
  • कोठडीमध्ये अटॅच टॉयलेट आणि बाथरूम
  • ३ वेळचे जेवण, स्वच्छ पाणी
  • झोपण्यासाठी कापसाची उशी, चादर आणि अंथरूण
  • कोर्टाच्या ऑर्डरवर मेटल अथवा लाकडाचा बेड
  • सीलिंग फॅन आणि लाईट
  • २४ तास सीसीटीव्ही
  • ताज्या हवेसाठी खुले अंगण
  • योग, मेडिटेशन आणि लायब्रेरी
  • मनोरंजनासाठी बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि कॅरम
  • २४ तास आरोग्य सुविधा
  • आपत्कालीन परिस्थितीत जे.जे हॉस्पिटलला सुविधा
  • कोर्टाच्या ऑर्डरवर घरातील जेवणाची परवानगी

 

त्याशिवाय जेलच्या कोठडीत ग्रीलच्या खिडक्या, वेंटिलेटर आणि सीलिंग फॅन असेल. मुंबईत जास्त उष्णता नसते, त्यासाठी कोठडीत एसी सुविधा नाही. मुंबई जेलमध्ये दररोज साफसफाई केली जाते, स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते. नियमित सफाई, पेस्ट कंट्रोल, महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. कोठडीत अंघोळ करण्याचीही सुविधा आहे. डॉक्टरांच्या सांगण्यांनुसार विशेष आहाराची व्यवस्था केली जाईल. २४ तास आरोग्य सुविधेत ६ मेडिकल अधिकारी, नर्स, फार्मासिस्ट आणि लॅबोरेटरीची व्यवस्था असेल. जेलमध्ये ICU सह २० बेडचे रुग्णालय आहे. आपत्कालीन परिस्थिती जवळच जे.जे रुग्णालय आहे. जेलमधील कैदी खासगी मेडिकल सुविधाही घेऊ शकतात. 

दरम्यान, बऱ्याच काळापासून भारतीय तपास यंत्रणा चोक्सीचा शोध घेत होत्या. मेहुल चोक्सी २०२१ च्या अखेरीस अँटिग्वामधून पळून गेला होता, त्यानंतर भारतीय तपास यंत्रणा दोन महिने बेल्जियमच्या एजन्सींच्या संपर्कात होत्या. चोक्सी सध्या बेल्जियममध्ये तुरुंगात आहे. बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन अटक वॉरंटच्या आधारे चोक्सीला ताब्यात घेतले. हे वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते.

टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाHome Ministryगृह मंत्रालयArthur Road Jailआर्थररोड कारागृह