पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोटाची धमकी
By Admin | Updated: September 28, 2016 13:08 IST2016-09-28T13:06:15+5:302016-09-28T13:08:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळमधील जाहीर सभेदरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोटाची धमकी
>ऑनलाइन लोकमत
कोळीकोड, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केरळमधील जाहीर सभेदरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करुन मोदींच्या दौ-यादरम्यान बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी दिली होती. आखाती देशातून हा इंटरनेट कॉल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले होते.
द फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नदक्कावु पोलीस स्थानकात एका अनोळखी व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली होती. मोदींवर कोझिकोड येथील सभेदररम्यान बॉम्ब टाकला जाईल अशी धमकी त्या व्यक्तीने दिली होती. धमकीनंतर पंतप्रधान मोदींची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी ७ सुरक्षा कवच बनवले गेले होते. सभेच्या ठिकाणी ३ किलोमीटरच्या परिसरातील संपूर्ण हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून होते.