शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान श्रमयोगी पेन्शन योजना देशभरात झाली लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 04:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ११ लाख ५१ हजार असंघटित कामगारांनी दिलेली १३ कोटी ५८ लाख ३१ हजार ९१८ रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा करून पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात केली.

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ११ लाख ५१ हजार असंघटित कामगारांनी दिलेली १३ कोटी ५८ लाख ३१ हजार ९१८ रुपयांची रक्कम बँक खात्यात जमा करून पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात केली. असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्तीनंतर ३ हजार रुपये देण्याची ही योजना आहे. याचा लाभ १0 कोटी असंघटित कामगारांना मिळणार आहे.अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. या कामगारांना साठ वर्षे पूर्ण होताच कायमस्वरूपी पेन्शन मिळाली, असा याचाउद्देश आहे. योजनेसाठीचा पहिला हप्ता कामगारांना रोख भरायचाअसून, नंतरचे हप्ते त्यांच्या खात्यातून थेट या योजनेत जमा होतील.योजनेचा अर्ज करण्यासाठी कामगारांना जवळच्या कॉमन सेंटरमध्ये जावे लागेल. अशी कॉमन सेंटर २0१४ साली केवळ ८0 हजार होती. आता त्यांची संख्या तीन लाख इतकी आहे.या वेळी मोदी म्हणाले की, आतापर्यंत या कामगारांना निवृत्तीनंतर उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. त्यांना आता किमान तीन हजार रुपये पेन्शन निश्चितपणे मिळू शकेल. ४२ कोटी श्रमिक व कामगारांना ही योजना मी अर्पण करीत आहेत. आतापर्यंतच्या सरकारांनी गरिबांच्या नावावर मते मिळविली, पण त्यांचे भले मात्र कधीच केले नाही. मात्र, आमच्या सरकारने गरिबांसाठी असंख्य योजना गेल्या पाच वर्षांत राबविल्या आहेत. पैशांचे घोटाळे थांबावेत वा मध्ये दलाल घुसू नयेत, यासाठी सर्व योजनांतील रक्कम संबंधितांच्या थेट बँक खात्यांमध्येजमा होत आहेत. श्रमयोगीयोजनेतील पेन्शनची रक्कमही कामगारांच्या बँक खात्यांमध्येच जमा केली जाईल. (वृत्तसंस्था)>काय आहे योजनाज्यांचे वय १८ ते ४0 च्या दरम्यान आहे व उत्पन्न १५ हजार रुपयांपर्यंत आहे, अशांना याचा लाभ मिळेल. वय १८ असलेल्या कामगाराला दरमहा ५५ रुपये भरावे लागतील, तर २९ वय असलेल्यांना १00 रुपये जमा करावे लागतील.ज्यांचे वय ४0 आहे, त्यांना मात्र योजनेसाठी दरमहा २00 रुपये भरावे लागतील. कामगार जितकी रक्कम भरतील, तितकीच सरकारही त्या योजनेत जमा करेल. या कामगारांना ६0 वर्षांनंतर रोजगार वा नोकरी नसेल, तेव्हा मासिक तीन हजार रुपये पेन्शन दिली जाईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी