पंतप्रधानांनी बहाणा करू नये -राहुल गांधी

By Admin | Updated: February 6, 2016 02:50 IST2016-02-06T02:50:55+5:302016-02-06T02:50:55+5:30

पंतप्रधानांनी बहाणा करू नये आणि त्यांनी आता देश चालवायला सुरुवात केली पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला.

PM should not be fooled - Rahul Gandhi | पंतप्रधानांनी बहाणा करू नये -राहुल गांधी

पंतप्रधानांनी बहाणा करू नये -राहुल गांधी

नवी दिल्ली : पंतप्रधानांनी बहाणा करू नये आणि त्यांनी आता देश चालवायला सुरुवात केली पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पलटवार केला.
२३ फेब्रुवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रारंभ होणार आहे आणि त्याआधी मोदींनी गांधी कुटुंबावर केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. आगामी अधिवेशनात काँग्रेस पक्ष अनेक मुद्यांवरून रालोआ सरकारचा विरोध करणार असल्याचे स्पष्ट संकेत राहुल गांधी यांनी यावेळी दिले.
मोदींवर प्रहार करताना राहुल गांधी म्हणाले, ‘पंतप्रधानांचे काम सरकार चालविणे आहे, बहाणा करणे नाही. अर्थव्यवस्था ठीकठाक चालत का नाही, शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार का मिळत नाही, कामगारांना जे मिळायला पाहिजे ते का मिळत नाही, अशाप्रकारचे अनेक बहाणे पंतप्रधान गेल्या १८ महिन्यांपासून करीत आहेत. भारताने नरेंद्र मोदी यांना असे बहाणे करण्यासाठी निवडून दिले नाही. भारताने एक नेता निवडला आणि या नेत्याने आता बहाणा करू नये. नेत्यांनी काम करावे यासाठीच त्यांना निवडले जाते.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: PM should not be fooled - Rahul Gandhi