शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

CAA Protest : नाराजी ओढवून घेत देशहितासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, CAAबाबत नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 15:32 IST

Citizen Amendment Act Protest : दिल्लीतील विज्ञान भवन येथे असोचेमच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सध्या देशभरात तीव्र आंदोलने होत आहेत. मात्र असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याचा जोरदार बचाव केला आहे. उद्योग जगताशी संबंधित असलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना देशाला संकटातून बाहेर काढण्याची आपली मोहीम कायम राहील, मात्र हे सारे काही सोपे नाही. त्यासाठी खूप काही सहन करावे लागते. मात्र देशासाठी हे काम करावे लागते, असे मोदींनी सांगितले.  दिल्लीतील विज्ञान भवन येथे असोचेमच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की, देशाला संकटांपासून मुक्ती मिळवून देताना अनेक लोकांचा रोष सहन करावा लागतो. आरोप झेलावे लागतात. मात्र असे असले तरी देशासाठी हे सारे काही करावे लागते. सत्तर वर्षे लागलेली सवय बदलण्यास वेळ लागतो. पण हे देशासाठी करावे लागते.'' असे मोदी म्हणाले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण संबोधनात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा नामोल्लेख करणे टाळले. मात्र इशाऱ्यांमधून त्यांनी आपले म्हणणे उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले की, ''हे सर्व असेच झाले असे वाटते का? अशा निर्णयांसाठी अनेक लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. अनेकांचा राग सहन करावा लागतो. तऱ्हेतऱ्हेचे आरोप सहन करावे लागतात.''  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे विधान आपल्या सरकारने अर्थव्यवस्थेने घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भाने केले होते. मात्र अनेक लोकांची नाराजी आणि रोष ओढवून घेण्याची गोष्ट त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात होत असलेल्या तीव्र आंदोलनाकडे इशारा करत केल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान, आपले सरकार हे समाजातील प्रत्येक वर्गाचे म्हणणे ऐकते असा दावा त्यांनी केला. आज देशात असे सरकार आहे जे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकते, मजुरांचे म्हणणे ऐकते, व्यापाऱ्यांचे ऐकते आणि उद्योग जगताचेही ऐकते. तसेच त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करते, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारत