शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा; भाजपच्या मित्रपक्षाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 14:40 IST

कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असल्यानं आक्षेप; भाजपच्या मित्रपक्षाच्या अध्यक्षांचं ट्विट

पाटणा: कोरोनाची लस घेतल्यानंतर देणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. याबद्दल विरोधकांसोबतच भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. झारखंड आणि छत्तीसगडनं तर प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी मांझी यांनी केली आहे.मस्तच! कोरोना चाचणीचा निष्कर्ष मिनिटात कळणार; श्वासाच्या आधारे झटक्यात निदान होणारबिहारमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता आहे. जीतनराम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा या आघाडीतील घटकपक्ष आहे. त्यामुळेच मांझी यांनी केलेल्या मागणीनं सगळ्यांनाच धक्का बसला. 'कोरोनाची लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर मोदींचं छायाचित्र छापण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील मोदींचा फोटो असायला हवा,' असं ट्विट मांझी यांनी केलं आहे.

कोरोना लसीकरण झालेल्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची गरज काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. यानंतर आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चानं त्यापुढे जात मोदींना खोचक टोला लगावला आहे. 'लसीच्या प्रमाणपत्रांवर फोटो छापण्याचा इतकी हौस असेल तर कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील फोटो छापला जावा. तेच न्यायाला धरून असेल,' असं मांझी यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केलं. मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणारपंतप्रधानांना लक्ष्य करणारं ट्विट डिलीट करण्याच्या आधी त्यांनी रविवारी रात्री एक ट्विट केलं होतं. 'कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मला एक प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यावर पंतप्रधानांचा फोटो आहे. देशातील घटनात्मक संस्थेचे प्रमुख राष्ट्रपती असतात. त्या नात्यानं प्रमाणपत्रावर राष्ट्रपतींचा फोटो असायला हवा. फोटो छापायचाच असेल तर राष्ट्रपतींच्या जागी पंतप्रधानांचा आणि स्थानिक मुख्यमंत्र्यांचा फोटो छापता येईल,' असं मांझी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी