CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 04:52 AM2021-04-18T04:52:52+5:302021-04-18T04:52:59+5:30

आता केवळ प्रतीकात्मक उत्सव

PM Narendra modi's appeal and Kumbh Mela ends | CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त

CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त

googlenewsNext

हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली : कुंभमेळा प्रतीकात्मक करावा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जुना आखाडाने शनिवारी रात्री कुंभमेळा समाप्तीची घोषणा केली. तथापि, कुंभमेळा आता केवळ प्रतीकात्मक राहणार आहे. 
कुंभमेळा ३० एप्रिल रोजी समाप्त होणार आहे. तथापि, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उत्तराखंड सरकारने संत, मठप्रमुख यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जुना आखाडाने ही घोषणा केली. 
मार्गदर्शक मंडळ आणि संत यांच्यातील मतभेदांमुळे कुंभ मेळा प्रतीकात्मक करण्याच्या घोषणेला उशीर झाला. 
आखाडा परिषद, विश्व हिंदू परिषद आणि मार्गदर्शक मंडळ यांच्यात दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झाल्या. विहिंपचे प्रमुख आलोक कुमार यांनी मार्गदर्शक मंडळाचे सदस्य आणि संत यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. आलोक कुमार हे स्वत: पॉझिटिव्ह आहेत. लोकमतशी बोलताना आलोक कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर कुंभ प्रतीकात्मक करण्यासाठी प्रयत्न सुरु होते. 

Web Title: PM Narendra modi's appeal and Kumbh Mela ends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.