शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

आताची काँग्रेस गांधी विचारांच्या विरोधी, नरेंद्र मोदी यांचा ब्लॉगमधून काँग्रेसवर निशाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 19:22 IST

भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - भारतीय इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. आज दांडी यात्रेला 89 वर्ष पूर्ण झाली. 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट  केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

त्याचसोबत मोदी यांनी टिविट्सोबत ब्लॉग जोडलेला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महात्मा गांधी यांनी असमानता आणि जाती विभाजन या गोष्टींना कधीच थारा दिला नाही. देशाची एकता हेच खरं स्वातंत्र्य आहे, मात्र दुख: आहे की, आत्ताच्या काँग्रेसने जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचं काम केलंय. काँग्रेस सरकारच्या काळात सर्वाधित जातीय दंगली आणि दलितांवर अत्याचार झाले. 

नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगमध्ये लिहलंय की, आपल्याला माहीत आहे का दांडी यात्रेमध्ये मुख्य भूमिका कोणाची होती ? ती महान सरदार पटेल यांची होती. पटेल यांनी दांडी यात्रेच्या योजनेत शेवटपर्यंत सहभाग घेतला. मात्र सरदार पटेल यांना ब्रिटीश सरकार घाबरत असल्याने दांडी यात्रा सुरु होण्याच्या काही दिवस आधीच त्यांना अटक करण्यात आली. पटेल यांना अटक केल्यानंतर इंग्रजांना वाटले की गांधी घाबरतील, पण असं काही घडले नाही. इंग्रजांच्या गुलामीविरोधात लढाई सुरुच राहिली. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे लिहितात की, मागील महिन्यात मी दांडीमध्ये होतो, त्याठिकाणी अत्याधुनिक संग्रहालय बनविण्यात आले आहे. मी सर्वांना आवाहन करतो की आपण एकदा त्याठिकाणी भेट द्यावी. गांधी यांनी नेहमी शिकवण दिली होती, तुम्ही गरिबांकडे बघा, त्यांची परिस्थिती जाणा आणि नंतर विचार करा की तुम्ही करत असलेल्या कामाचा गरिबाच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो. मला सांगताना गर्व होतोय की, आमचं सरकार महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या याच मार्गावर चालत आहे. गरिबी दूर करून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी आमचं सरकार कटीबद्ध आहे. या गोष्टीचं दुख: आहे की सध्याची काँग्रेस गांधी यांच्या विचारधारेच्या विरुध्द वागत आहे. महात्मा गांधी यांनी अतिरिक्त धनापासून दूर राहायला हवं असं सांगितले होते. मात्र काँग्रेसने जी काही कामं केली ती स्वत:ची तिजोरी भरण्यासाठी वापरली. गरिबांच्या जीवावर काँग्रेसने आपलं जीवन अलिशान बनवलं. बापूंनी घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला मात्र आता काँग्रेस घराणेशाहीला प्राधान्य देतं आहे. 1947 साली महात्त्मा गांधी यांनी सांगितले होते की, भारताच्या स्वच्छ प्रतिमेचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. तो व्यक्ती  कोणत्याही पक्षाचा अथवा विचारांचा असला तरी चालेल देशाच्या प्रतिमेचे रक्षण करायला हवं. आम्ही भ्रष्टाचाराला आळा घालत भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई केली. मात्र काँग्रेस आणि भ्रष्टाचार हे समीकरण देशाने बघितलं आहे. कोणत्याही क्षेत्राचे नाव घेतलं तरी त्यात काँग्रेसने घोटाळा केला आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीMahatma Gandhiमहात्मा गांधीcongressकाँग्रेसGujaratगुजरात