Narendra Modi : मोदींनी उत्तराखंडची टोपी का घातली, बिपीन रावत की निवडणूक? अचूक टायमिंग साधायचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 12:42 PM2022-01-26T12:42:54+5:302022-01-26T12:55:37+5:30

PM Narendra Modi And Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनी मोदींचा नवा लूक पाहायला मिळाला. त्यांच्या या खास पेहरावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

PM Narendra Modi wears uttarakhandi topi at war memorial on 26 january republic day eye on assembly election | Narendra Modi : मोदींनी उत्तराखंडची टोपी का घातली, बिपीन रावत की निवडणूक? अचूक टायमिंग साधायचा प्रयत्न

Narendra Modi : मोदींनी उत्तराखंडची टोपी का घातली, बिपीन रावत की निवडणूक? अचूक टायमिंग साधायचा प्रयत्न

googlenewsNext

नवी दिल्ली - देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.  देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीतील राजपथावर भारतीय संस्कृती आणि संरक्षण सामर्थ्याचं दर्शन घडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज सकाळी नॅशनल वॉर मेमोरियल येथे गेले, तेव्हा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी विविध ऑपरेशन्समध्ये शहीद झालेल्या 26,000 जवानांना श्रद्धांजली वाहिली आणि ते राजपथाकडे रवाना झाले. यावेळी मोदींचा नवा लूक पाहायला मिळाला. त्यांच्या या खास पेहरावाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली आहे. या टोपीवर ब्रह्मकमळ पाहायला मिळत आहे. ब्रह्मकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये वापरत असलेला स्टोल घातला आहे. नरेंद्र मोदी यांनी यंदा पांढऱ्या कुर्त्यावर ग्रे रंगाचं जॅकेट परिधान केलं. दरम्यान, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नरेंद्र मोदी यांनी तेथील पारंपारिक पोशाखाची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निवड केल्याचं पाहायला मिळालं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मिशन इलेक्शन?

पंतप्रधानांच्या या नव्या लूककडे दोन्ही राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अचूक टायमिंग साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. उत्तराखंड, मणिपूरसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ब्रह्मकमळ असलेली काळ्या रंगाची उत्तराखंडची टोपी निवडणुकीसह दिवंगत CDS जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली म्हणून देखील पाहिली जात आहे. बिपीन रावत हे पंतप्रधान मोदींच्या जवळचे मानले जात होते. मात्र हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. बिपीन रावत हे उत्तराखंडचे होते. खासगी कार्यक्रमांमध्ये ते उत्तराखंडची टोपी घालायचे. सध्या निवडणुकीचं वातावरण असल्याने पंतप्रधानांचा हा लूकही निवडणुकीशीच जोडला जात आहे. 

प्रजासत्ताक दिनी खास लूक, उत्तराखंडची टोपी अन् मणिपुरी स्टोल

उत्तराखंडमध्येही निवडणुका आहेत. सर्व 70 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत ही टोपी उत्तराखंडच्या लोकांशी मोदींची भावनिक जोड असल्याचंही मानलं जात आहे. राजकारणात अशा छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्त्व असतं. अशा वेळी  निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदींची उत्तराखंडी टोपी घालणे भाजपासाठी बूस्टर ठरू शकतं. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 मार्च रोजी होणार आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एन बीरेन सिंह सरकारची अग्निपरीक्षा असणार आहे. अशातच पंतप्रधान मोदींनी मणिपुरी स्टोल परिधान करण्यामागे राजकीय संकेतही दडले असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: PM Narendra Modi wears uttarakhandi topi at war memorial on 26 january republic day eye on assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.