शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

मोदींचे एकाच महिन्यात तीनवेळा गुजरात दौरे; उत्तर प्रदेशनंतर गृहराज्याला सर्वाधिक भेटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 07:11 IST

लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीतीलप्रशासन (एलबी एसएनएए) फाऊन्डेशन कोर्सला उपस्थित राहणाऱ्या ४०० जणांना ते संबोधित करतील.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान पुन्हा गुजरातचा दौरा करणार असून या महिन्यात गृहराज्याला दिलेली ही त्यांची तिसरी भेट ठरेल. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीतीलप्रशासन (एलबी एसएनएए) फाऊन्डेशन कोर्सला उपस्थित राहणाऱ्या ४०० जणांना ते संबोधित करतील. केवडिया येथील नर्मदा नदीच्या तीरावरील 'स्टॅच्यू ऑफ जाईल. युनिटी' या स्थळावरच हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

'आरंभ' च्या चौथ्या आवृत्तीची औपचारिक सुरुवात त्यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी नवे आयएएस अधिकारी आणि संलग्न सेवेत सहभागी नव्या कर्मचाऱ्यांसमोर पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची महती पटवून देतील. वल्लभभाई पटेल यांनी ५६२ संस्थानांचे देशात विलीनीकरण केले होते, याचे स्मरण यानिमित्ताने केले जाईल.

यापूर्वी मोदींनी १९-२० ऑक्टोबर रोजी डिफेन्स एक्स्पोचे उद्घाटन करतानाच हजारो कोटींच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. मे २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान बनल्यापासून मोदींनी गेल्या तीन वर्षात २२ वेळा गुजरातला भेटी दिल्या आहेत. सप्टेंबर २०२२ रोजी त्यांनी अहमदाबाद येथे ३६ व्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन केले होते. ९-११ ऑक्टोबर आणि १९-२२ ऑक्टोबर अशा दोन भेटी त्यांनी याच महिन्यात दिल्या आहेत. पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक भेटी गुजरातला दिल्या आहेत.

निवडणुकीवर डोळा....निवडणूक आयोगाकडून गुजरातमध्ये कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते. विधानसभा निवडणुकीत विक्रमी विजय मिळवण्याच्या उद्देशानेच मोदींनी दौरे चालविल्याचे दिसते. मोदींनी काही भेटींमध्ये रोड शो करीत जनसंपर्कावर भर दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गुजरातला अनेक भेटी दिल्या आहेत. प्रचारयंत्रणेतील कमकुवतपणा दूर करण्यासाठी त्यांनी एकाच महिन्यात चारदा गुजरातला भेटी दिल्या आहेत, हे विशेष.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरात