शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारत खरेदी करणार २६ राफेल आणि तीन पाणबुड्या? PM मोदींच्या फ्रान्स दौऱ्यावर होऊ शकते घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 08:55 IST

गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 14 जुलै या दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान एका मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी मिळू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार भारत फ्रान्सकडून २६ राफेल आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करू शकतो. दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. 

नरेंद्र मोदींच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान या करारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे. सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, संरक्षण दलाने हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयासमोर ठेवला आहे. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान याची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

प्रस्तावांनुसार, भारतीय नौदलाला चार ट्रेनर विमानांसह २२ सिंगल-सीटेड राफेल सीप्लेन मिळू शकतात. देशभरातील सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नौदलाने ही लढाऊ विमाने आणि पाणबुड्या तात्काळ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रस्तावांवर यापूर्वीच संरक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकांमध्ये चर्चा झाली असून येत्या काही दिवसांत ते संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर ठेवण्याची शक्यता आहे.

याचबरोबर, विमानवाहू युद्धनौका आयएनएस (INS) विक्रमादित्य आणि विक्रांत मिग-२९ ला लढाऊ विमान राफेलची गरज आहे. दरम्यान, तीन स्कॉर्पिन-क्लास पाणबुड्या नौदलाकडून प्रकल्प ७५ चा भाग म्हणून रिपीट क्लॉज अंतर्गत अधिग्रहित केल्या जातील. ज्या मुंबईतील माझगांव डॉकयार्ड्स लिमिटेडमध्ये तयार करण्यात येतील.

९० हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा असेल करार! हा करार ९० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. मात्र, अंतिम खर्च करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच समजणार आहे. दरम्यान, भारत करारामध्ये किंमतीत सवलत मिळवू शकतो आणि योजनेमध्ये अधिक 'मेक-इन-इंडिया' सामग्री ठेवण्यासाठी जोर वाढवू शकतो, असे  सूत्रांनी सांगितले. तसेच, राफेल डीलसाठी भारत आणि फ्रान्स या करारावर वाटाघाटी करण्यासाठी संयुक्त टीम तयार करतील अशी शक्यता सुद्धा सूत्रांनी वर्तविली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या बॅस्टिल डेला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या बॅस्टिल डेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासोबत भारत-फ्रान्स द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांची 25 वर्षे साजरी करण्यासाठी नरेंद्र मोदी फ्रान्सला भेट देतील. तसेच, या भेटीदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पंतप्रधान मोदींसोबत पॅरिसमधील प्रसिद्ध संग्रहालयाला भेट देणार असून पंतप्रधान मोदी प्रवासी भारतीयांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलIndiaभारतFranceफ्रान्स