PM Narendra Modi US Visit: पंतप्रधान मोदी येत्या 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेचा दौरा करणार आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरुन पीएम मोदी तिथे जात आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतच्या चर्चेत भारतीयांसोबत अमेरिकेने केलेल्या गैरवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. तर, भारताचे परराष्ट्र मंत्रालयदेखील भारतीयांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाबाबत अमेरिकन सरकारच्या सातत्याने संपर्कात आहे.
हद्दपारीची प्रक्रिया नवीन नाहीपरराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, अवैधरित्या राहणाऱ्यांना लष्करी विमाने बेड्या घालून पाठवणे, हा 2012 पासून अमेरिकन निर्वासन प्रक्रियेचा एक भाग आहे. हद्दपारीची ही प्रक्रिया काही नवीन नाही. पण, गैरवर्तनाच्या मुद्द्यावर आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून, भारतीयांसोबत गैरवर्तणूक होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या निदर्शनास आलेली गैरवर्तनाची प्रकरणे आम्ही मांडत राहू.
आणखी 487 भारतीय परतणारदरम्यान, अमेरिकेतून आणखी 487 भारतीयांना हद्दपार केले जाणार असल्याची माहितीही मिस्त्री यांनी दिली. ते म्हणाले की, अमेरिकेने भारताला 487 संभाव्य भारतीय नागरिकांची माहिती दिली आहे, त्यांना लवकरच हद्दपार केले जाईल. या सर्व भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत सरकार ट्रम्प प्रशासनाच्या संपर्कात आहे. हा एक कायदेशीर मुद्दा आहे, पण आम्ही यूएस अधिकाऱ्यांना हद्दपार केलेल्यांशी गैरवर्तन केले जाऊ नये, यावर जोर देत राहू, अशी माहिती त्यांनी दिली.