शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

काँग्रेसवर हल्लाबोल, खासदारांना कानमंत्र..., NDA च्या बैठकीत PM नरेंद्र मोदी काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 13:10 IST

Narendra Modi : या बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, उपस्थित एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन केले.

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत संसदेच्या संयुक्त अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, उपस्थित एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन केले.

या बैठकीला एनडीएचे सर्व खासदार उपस्थित होते. संसदीय पक्षाच्या बैठकीत नरेंद्र मोदींचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. एनडीएच्या विजयाबद्दल नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच, सलग तीन वेळा जिंकणे ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत पंडित जवाहरलाल नेहरूंच्यासमोर कुठल्याही अडचणी नसताना ते जिंकले होते. पण आपल्यासमोर अनेक आव्हाने असतानाही एनडीएला एवढा मोठा विजय मिळाला, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवीन खासदारांना प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, एकाच कुटुंबातून अनेक पंतप्रधान झाले आणि काही सुपर पंतप्रधान बनले. पण एक चहावाला पंतप्रधान झाल्यामुळे त्यांना ही गोष्ट  पचत नाही, म्हणूनच ते आमच्यावर वारंवार हल्ला करत आहेत.

नव्या खासदारांना आवाहन करत संसदेच्या कामकाजात जास्तीत जास्त सहभाग नोंदवा, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले. तसेच, तुमच्या लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडा. सर्व खासदारांनी देशसेवा हीच महत्त्वाची गोष्ट असल्याचे लक्षात ठेवावे. खासदारांनी आपले वर्तन आणि आचरण योग्य ठेवावे. खासदारांनी संसदेच्या नियमांनुसार वागले पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

याशिवाय,  खासदारांनी आपल्याला ज्या विषयांमध्ये विशेष स्वारस्य आहे, ते विषय शेअर केले पाहिजेत. तसेच, प्रत्येक खासदाराने आपल्या कुटुंबासह पीएम संग्रहालयाला भेट द्यायला हवी. इकडे-तिकडे भाषणे करण्यापेक्षा योग्य व्यासपीठावर आपली मते मांडणे योग्य ठरेल, असा मंत्र सुद्धा नरेंद्र मोदींनी बैठकीत उपस्थित खासदारांना दिला आहे.

काय म्हणाले किरेन रिजिजू?बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "आज पंतप्रधानांनी आम्हाला एक मंत्र दिला, जो खूप महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांनी एनडीएच्या खासदारांना संसदेचे नियम, संसदीय लोकशाही प्रणाली आणि आचार यांचे पालन करण्याचे आवाहन केले, जे चांगले संसदपटू होण्यासाठी आवश्यक आहे. पंतप्रधानांचे हे मार्गदर्शन सर्व खासदारांसाठी, विशेषत: नव्या खासदारांसाठी एक चांगला मंत्र आहे. या मंत्राचे पालन करण्याचे आम्ही ठरवले आहे." 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभाParliamentसंसद