शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 20:34 IST

या शिष्टमंडळांनी जगातील अनेक देशांचा दौरा केला आणि ऑपरेशन सिंदूर, भारताची दहशतवादाविरोधात भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला.

नवी दिल्ली - ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जगातील विविध देशात पाठवले होते. लवकरच हे शिष्टमंडळ पुन्हा भारतात परतणार आहे. त्यानंतर या सर्व शिष्टमंडळातील खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेतील. येत्या ९ किंवा १० जून रोजी मोदी शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. शिष्टमंडळातील सदस्य खासदार परदेश दौऱ्यात आलेले अनुभव आणि तिथल्या बैठकांबाबत मोदींना माहिती देतील. 

या शिष्टमंडळांनी जगातील अनेक देशांचा दौरा केला आणि ऑपरेशन सिंदूर, भारताची दहशतवादाविरोधात भूमिका आणि पाकिस्तानचा खरा चेहरा  जगासमोर आणला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर गेले आहेत. ज्यांचा मुख्य हेतू जागतिक पातळीवर भारताची भूमिका मांडणे हा आहे. या शिष्टमंडळांनी विविध देशातील अधिकारी, मंत्र्यांसोबत बैठक घेतली. त्यात भारताची भूमिका प्रभावीपणे त्यांच्यासमोर मांडली. या दौऱ्यात झालेला संवाद आणि भारताच्या प्रयत्नांना मिळालेल्या प्रतिसादाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली जाईल.

बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ भारतात परतल्यावर आधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतील. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ ६ जून रोजी संध्याकाळी ७.३० वाजता जयशंकर यांना भेटेल. संजय झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ ३ जूनला रात्री तर शिंदे यांचे शिष्टमंडळ दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीत येईल. २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. या हल्ल्यानंतर भारताने ६ मे च्या रात्री ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १०० हून अधिक कुख्यात दहशतवादी मारले गेले. भारत कुठल्याही प्रकारचा दहशतवाद यापुढे सहन करणार नाही, त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल अशी कठोर भूमिका भारताने घेतली. भारताच्या दहशतविरोधी भूमिकेवर जगातील इतर देशांचे समर्थन मिळवणे आणि पाकिस्तानचा बुरखा फाडणे ही भारताची नीती होती. त्यासाठी भारताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील खासदारांचे ७ शिष्टमंडळ जगातील विविध देशात पाठवले होते.

दरम्यान, या शिष्टमंडळांनी ३३ देशांचा दौरा केला. त्यात अमेरिका, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, पूर्व आशियातील महत्त्वाच्या देशांचा समावेश होता. या प्रमुख शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमेरिका, पनामा, गुयाना, ब्राझील, कोलंबिया या देशांचा दौरा केला. रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वात यूके, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्क आणि युरोपीय संघाचा दौरा करण्यात आला. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मध्य पूर्व आणि आफ्रिकातील काही देशांचा दौरा झाला. सुप्रिया सुळे, कनिमोझी करुणानिधी यांनीही विविध देशांचा दौरा केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तान