शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरला?; पंतप्रधान मोदींच्या भाषणातून मोठे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 16:54 IST

२०४७ मध्ये देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहायचे असेल, तर महिलांच्या सहभागाशिवाय हे काम अपूर्णच राहणार असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा स्पष्ट केला आहे. ‘भ्रष्टाचारावर केलेली कारवाई’ या जोरावर भाजपा ही लढाई लढणार असल्याचे संकेत मोदींनी दिले आहेत. ईडी-सीबीआयच्या राजकीय गैरवापराबाबत विरोधकांच्या आरोपांमुळे विचलित न होता भ्रष्ट नेत्यांवर कारवाई सुरूच राहील असंही पंतप्रधान मोदींच्या भाषणातून संकेत मिळाले आहेत.  

म्हणजेच आगामी काळात विरोधी पक्षनेत्यांच्या अडचणी वाढू शकतात. महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधानांनी आगामी काळातही केंद्र सरकारच्या महिलाभिमुख योजना महत्त्वाच्या राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो याची जाणीव भाजपाला आहे. पंतप्रधानांनी विविध क्षेत्रातील पात्र तरुणांच्या प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा अडथळा असल्याचं म्हटलं. सर्व क्षेत्रांतून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे समूळ उच्चाटन केल्यास त्या क्षेत्रातील तरुणांचा  मार्ग सुकर होईल असं मोदींनी सांगितले. यामुळे बिगर राजकीय क्षेत्रातही भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट होते. यामुळे तरुणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मजबूत होईल.

पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून 'महिलांच्या सन्मानाचा' मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. सार्वजनिक जीवनातही लोक महिलांचा अपमान करतात, असे त्यांनी म्हटले आहे. यातून महिलांचा अपमान तर होतोच, पण त्यामुळे देशाच्या आणि समाजाच्या विकासाला खीळ बसते. २०४७ मध्ये देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहायचे असेल, तर महिलांच्या सहभागाशिवाय हे काम अपूर्णच राहणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. महिलांना योग्य भूमिका दिल्यास भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प सोपा होईल. केंद्र सरकारच्या योजनांमध्ये येत्या काही वर्षांत महिलाभिमुख योजनांचा समावेश राहणार असल्याचेही यावरून स्पष्ट होते. २०१९ मध्ये भाजपाच्या सत्तेत पुनरागमन करण्यात महिलांचाही मोठा वाटा होता.

गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडपासून देशाच्या अनेक भागांमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांची रोकड, मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्यतः विरोधी पक्षांच्या नेत्यांवर किंवा त्यांच्या जवळच्या लोकांवर झाली असल्याने, विरोधकांना धमकावण्याचा आणि राज्यात सत्ता मिळवण्याचा उद्देश असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण हा आरोप पूर्णत: खरा नाही. केंद्र सरकारने राजकारणासह अनेक क्षेत्रातील भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई केली आहे. केंद्र सरकारच्या कारभारात मूळ असलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बळजबरीने निवृत्त करून त्याची सुरुवात झाली. नंतर अशाच प्रकारची कारवाई इतर बिगर राजकीय क्षेत्रातही करण्यात आली आहे असंही मोदींनी भाषणातून सूचित केले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा