शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनजीवी प्रवृत्तींपासून सावध राहा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 06:52 IST

नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोप मोदी यांनी केला.

नवी दिल्ली : आंदोलन केल्याशिवाय जगू न शकणारी ‘आंदोलनजीवी’ ही नवी जमात सध्या देशात पैदा झाली आहे. या आंदोलनकारी प्रवृत्तींपासून देशाने सावध राहायला हवे, अशी कडक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली. नव्या कृषी कायद्यांना यापूर्वी पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी आता घूमजाव केले आहे, असा आरोपही मोदी यांनी केला.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभार प्रदर्शनाच्या ठरावावरील चर्चेत विरोधकांनी अनेक मुद्दे राज्यसभेत उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना मोदी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू ठेवलेले आंदोलन मागे घ्यावे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. मोदी यांनी सांगितले की, नवे एफडीआय (विदेशी विध्वंसक विचारसरणी) फोफावताना दिसत आहे. अशा विचारांपासून देशाला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी अधिक जागरूक राहिले पाहिजे. शेतकऱ्यांनी नव्या कृषी कायद्यांबद्दल केंद्र सरकारशी चर्चा करण्याकरिता पुढे यावे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. याआधीही केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी काही वेळा चर्चा केली आहे. आंदोलनात वयोवृद्ध गृहस्थ दिवसेंदिवस ठिय्या देऊन बसले आहेत, ही चांगली गोष्ट नाही. या वयोवृद्धांना आंदोलकांनी घरी परत पाठविले पाहिजे.  नरेंद्र मोदी म्हणाले की, किमान हमीभावही कायम राहणार आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे सुधारणा अधिक गतिमान होणार आहेत. त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहिजे. 

शिखांची बदनामी करण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शिखांबद्दल काही जणांनी वापरलेली बदनामीकारक भाषा अतिशय अयोग्य आहे. हा डाव हाणून पाडला पाहिजे. शेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहे याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

शरद पवारांनी विराेध केला नाहीशरद पवार व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी याआधी शेती सुधारणांना पाठिंबा दिला आहे. आताही पवारांनी शेती सुधारणांना विरोध केलेला नाही. आमच्या सरकारला ज्या योग्य वाटल्या, त्या शेती सुधारणा आम्ही केल्या आहेत. यापुढेही करत राहू.

भाषणात डाॅ. सिंग यांचा उल्लेखशेतीमध्ये योग्य सुुधारणा झाल्या पाहिजेत, असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांच्या विचारांची अंमलबजावणी मोदी करत आहेत, याचा काँग्रेसला अभिमान वाटला पाहिजे.

किमान हमी भाव कायम राहण्यासाठी कायदा करावागाझियाबाद : किमान हमी भाव कायम राहाण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा केली आहे. भूक, अन्नधान्याशी संबंधित प्रश्नांवर व्यापारी पद्धतीच्या वाटाघाटी कोणीही करू नयेत. असे प्रयत्न करणाऱ्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे.  केंद्राने नवे कृषी कायदे मागे घ्यावेत. शेतकरी सरकारशी चर्चा करण्याकरिता तयार आहेत असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसFarmers Protestशेतकरी आंदोलन