शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 06:26 IST

‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला.

जितेंद्र प्रधान, लोकमत न्यूज नेटवर्क, बिकानेर: ‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. माझ्या नसानसांत आता रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहते आहे. भारतावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल, असेही त्यांनी बजावले. पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले.

राजस्थानमधील पहिल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भारताने बदला घेण्यासाठी नव्हे तर न्याय मिळविण्यासाठीचा नवा मार्ग म्हणून ऑपरेशन सिंदूरची कारवाई केली. भारत अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही. पाकिस्तानला भारताच्या हक्काच्या पाण्याचा वाटा मिळणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

मैं देश नहीं मिटने दूंगा, मोदींनी घेतली होती शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१९ मधील बालाकोट हवाई हल्ल्यानंतर “सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा” – अशी शपथ मी घेतली. या मोदीचे मन शांत आहे; पण त्याच्या नसांतून वाहणारे रक्त मात्र गरम आहे. मी माँ भारतीचा सेवक आहे, असेही ते म्हणाले.  ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मोदींनी भारतीय सैन्य दलांचे कौतुक केले. ते म्हणाले की, सरकारने तिन्ही सैन्यदलांना स्वातंत्र्य दिले. त्यांनी एकत्र येऊन असा सापळा रचला की पाकिस्तानला भारतासमोर गुडघे टेकावेच लागले. 

केंद्र सरकारने तडजोड केली : राहुल गांधी 

भारताची प्रतिष्ठा, सन्मानाशी केंद्राने तडजोड केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. पाकविरुद्धची  लष्करी कारवाई थांबविण्याचा निर्णय घेऊन सरकारने देशहिताशी गद्दारी केली अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले की, सरकारमधील प्रमुखांनी पोकळ भाषणे थांबवावीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर झुकून भारताच्या हितालाच बाधा का आणली? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरNarendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर