शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

"पंतप्रधान मोदींनी पहिले कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, नंतर आम्ही घेऊ"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2021 2:14 PM

देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिल्यानंतर झाली राजकारणाला सुरूवात

ठळक मुद्देयापूर्वी अखिलेश यादव यांनीही केली होती टीकातेजप्रताप यादव यांचा लसीकरणावरून पंतप्रधानांवर हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी भारतानं सीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपात्कालिन वापरास परवानगी दिली. परंतु त्यानंतर लसींवरूनही देशात राजकारणाला सुरूवात झाली आहे. यापूर्वी लसीच्या किती सुरक्षिततेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. दरम्यान, आता राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र आणि माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी लसीकरणावरून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीवर यापूर्वी मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता तेजप्रताप यादव यांनीदेखील त्यांच्या सूरात सूळ मिसळला आहे. "कोरोनाची जी लस आली आहे ती सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात यावी. त्यानंतर आम्ही ती लस घेऊ," असं तेजप्रताप यादव म्हणाले.  कोरोनाच्या लसीवरून बिहारच्या नेत्यांनीही टीका करण्यास सुरूवात केली आहे. "ज्या प्रमाणे रशिया आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिले लस घेतली त्याचप्रमाणे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले लस घ्यावी," अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अजित शर्मा यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यांनंतर राजकारण तापू लागलं आहे. तर दुसरीकडे जदयूनं राजद आणि काँग्रेसच्या वक्तव्यांचाही समाचार घेतला आहे. "काँग्रेसचं जर स्वदेशीवर काही प्रश्नचिन्ह असेल तर राहुल गांधी आपल्या परदेश दौऱ्यावरच आहेत. अशात त्यांनी परदेशातूनही लस घेऊन भारतात यावं," असं म्हणत जदयूचे प्रवक्ते राजीव रंजन यांनी काँग्रेसवर टीका केली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा