शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फोटोशूट कमी करा, कामाकडे लक्ष द्या; काँग्रेस नेत्याचा मोदींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 15:46 IST

नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जींच्या विधानावरुन टीकास्त्र

नवी दिल्ली: नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जींनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी आता फोटोशूटकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष द्यावं, असा सल्ला सिब्बल यांनी पंतप्रधानांना दिला आहे. मूळचे भारतीय असलेल्या अभिजीत बॅनर्जींना काल अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर झालं. यानंतर एका अमेरिकन वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना बॅनर्जींनी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. 'भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान अवस्थेत आहे. विकासदराची ताजी आकडेवारी पाहता, नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्था सावरेल, याची खात्री देता येत नाही. गेली पाच-सहा वर्षे निदान काही विकास होताना तरी दिसत होता, पण ती आशाही आता मावळली आहे,' असं बॅनर्जींनी म्हटलं होतं.  बॅनर्जींनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. 'मोदीजी खोटं बोलताहेत का? अभिजीत बॅनर्जी: 1) भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान स्थितीत आहे. 2) आकडेवारीत राजकीय हस्तक्षेप आहे. 3) शहरी आणि ग्रामीण भागातील मागणी घटली आहे. 4) आपण (भारत) संकटात आहे. त्यामुळे फोटोशूटऐवजी कामाकडे लक्ष द्या,' असा खोचक सल्ला सिब्बल यांनी ट्विटमधून पंतप्रधानांना दिला आहे. जागतिक बँकेनंदेखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या मरगळ आली असून येत्या काही दिवसांत अर्थक्षेत्राची स्थिती आणखी खालावेल, असं भाकीत जागतिक बँकेनं वर्तवलं आहे. काही आर्थिक तिमाहींपूर्वी भारताच्या जीडीपी वाढीचा दर चीनपेक्षाही जास्त होता. तो आता बांगलादेश आणि नेपाळपेक्षा कमी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीचा दर ७.५ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था केवळ ५ टक्क्यांनी वाढली. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkapil sibalकपिल सिब्बलEconomyअर्थव्यवस्था