शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात सापडला १८०० कोटी रुपयांचा ड्रग्स साठा; गुजरात ATS अन् कोस्ट गार्डला मोठं यश
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक; भारताच्या विनंतीवरून कारवाई: रिपोर्ट्स
3
"बॉम्बने त्याची गाडी उडवून देऊ", सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
4
मुलींकडून अभ्यास करुन घेण्यासाठी घेतला iPad; आईला घेऊन गेले पोलीस, आला चोरीचा आळ
5
"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई
6
अखेर काय आहे ट्रम्प यांचा प्लान? आता यू-टर्न घेत म्हटलं, "कोणीही सूटणार नाही, सर्वच देश निशाण्यावर..."
7
पवन कल्याण यांच्या पत्नीनं तिरुमाला मंदिरात संपूर्ण केस दान केले; काय आहे कारण?
8
मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 
9
अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय
10
Astro Tips: इच्छापूर्ती वा आर्थिक अडचणीतून सुटकेसाठी चार सोमवार करा 'हे' सोपे उपाय!
11
लहान मुलावर लाईट कोसळली अन्...; 'गुड बॅड अग्ली' सिनेमाच्या शोदरम्यान घडली दुर्दैवी घटना
12
बिग बींनी ट्वीट करत विचारली फॉलोवर्स वाढवायची ट्रिक, चाहत्याने सांगितला भन्नाट उपाय, म्हणाला- "रेखासोबत..."
13
'भारताच्या सर्जनशीलतेची  अवघ्या जगाला भुरळ', ‘लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड’मध्ये प्रेक्षक मंत्रमुग्ध
14
'भारतीय औषध कंपनीवर रशियाने केला मुद्दाम हल्ला'; नव्या हल्ल्यात ३२ जण ठार
15
रणबीर कपूरने 'हायवे'च्या प्रमोशनपासून दूर ठेवलेलं? रणदीप हुडा म्हणाला, "हो, मलाही तेच वाटलं..."
16
FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट 
17
IPL 2025: ऋतुराज गायकवाडच्या जागी CSK मध्ये १७ वर्षांचा मराठमोळा आयुष म्हात्रे; किती पैसे मिळणार?
18
केवळ ४ वर्षांपर्यंत जमा करावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळेल १ कोटींचं बेनिफिट; जाणून घ्या LIC च्या स्कीमबाबत
19
४०१ जणांनी १० तास केली मोजणी; बांगलादेशातील 'या' मशिदीला भरभरून दान, फक्त २४ तासांत...
20
Tarrif War: भारत निर्यातीत बनणार ‘दादा’, लाखो नव्या नोकऱ्या निर्माण होणार

PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 16:20 IST

Narendra Modi Rally : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील ही पहिलीच सभा असणार आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत मोठी सभा होणार आहे. नरेंद्र मोदींची ही सभा पाहण्यासाठी १३ देशांतील २५ हून अधिक राजदूत येणार आहेत. भारतातील लोकशाहीचा उत्सव जवळून पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी हे परदेशी राजदूत उत्तर-पूर्व  दिल्लीतील पंतप्रधानांच्या सभेला उपस्थित राहणार आहेत.

लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीतील ही पहिलीच सभा असणार आहे. ज्यामध्ये युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, मॉरिशस, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड आणि सेशेल्स येथील राजदूत उपस्थित राहतील. "भाजपाला जाणून घ्या" कार्यक्रमांतर्गत, भाजपाच्या परराष्ट्र विभागाने या राजदूतांना जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी आणि पक्षाची माहिती घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. 

दिल्लीच्या सभेत परदेशी राजदूतांना आमंत्रण दिल्यानंतर, भाजपाने महिन्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्ये राजदूतांच्या पार्टीचे आयोजन करण्याची योजना आखली आहे, जेथे १ जून रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजदूतांचे एक शिष्टमंडळ ओडिशालाही भेट देणार असून, काही राजदूत राजस्थान आणि गुजरातलाही गेले आहेत.

दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर २५ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी साडे सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर-पूर्व दिल्लीत जाहीर सभेला संबोधित करतील. दरम्यान, उत्तर-पूर्व दिल्लीतून भाजपाने मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. तर मनोज तिवारी यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राहुल गांधी यांचीही होणार सभादुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही आज दिल्लीत सभा होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीसोबत एकजुटता असल्याचे दाखवण्यासाठी ३१ मार्च रोजी झालेल्या इंडिया आघाडीच्या संयुक्त रॅलीनंतर आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी रामलीला मैदानावर आयोजित सभेला संबोधित करतील. राहुल गांधी यांची दिल्लीतील ही पहिलीच सभा असणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४north-east-delhi-pcउत्तर पूर्व दिल्ली