शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मित्रों, स्वातंत्र्य दिनीच मोदींनी सव्वासो करोड देशवासीयांना फसवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 16:46 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारी चुकीच्या पद्धतीनं सांगितली

नवी दिल्ली: स्वच्छ भारत योजनेमुळे 3 लाख मुलांचा जीव वाचला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना म्हटलं. ही आकडेवारी देताना मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी दिलेली आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारी यात मोठा फरक आहे. त्यामुळे मोदींच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख केला. स्वच्छ भारत अभियानामुळे आतापर्यंत तीन लाख मुलांचा जीव वाचला असल्याचं मोदी म्हणाले. यासाठी पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा संदर्भ दिला. 'मी 2014 मध्ये लाल किल्ल्यावरुन भाषण करताना स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली. त्यावेळी काही लोकांनी माझी खिल्ली उडवली होती. सरकारनं अशा गोष्टींवर आपली उर्जा वाया घालवू नये, असा सल्ला त्यावेळी काहींनी दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल प्रसिद्ध झाला. स्वच्छ भारत अभियानामुळे 3 लाख मुलांचा जीव वाचला, असं जागतिक आरोग्य संघटनेनं अहवालात नमूद केलं आहे. तीन लाख गरीब मुलांचा जीव वाचवणं, ही मानवतेच्या दृष्टीनं मोठी गोष्ट आहे,' असं मोदी म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानामुळे तीन लाख मुलांचा जीव वाचला का?या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागानं एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख आहे. 'स्वच्छतेसाठी भारताकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत ठेवण्यात आलेलं उद्दिष्ट गाठण्यात 100 टक्के यश मिळाल्यास तीन लाख मुलांचा जीव वाचेल. हे अभियान पूर्णपणे यशस्वी ठरल्यास अतिसार आणि कुपोषणामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतील,' असं जागतिक आरोग्य संघटनेनं अहवालात म्हटलेलं आहे. मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करत त्यांच्या अहवालाचा संदर्भ दिला. मात्र ही आकडेवारी चुकीची आहे. ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियान 100 टक्के यशस्वी ठरल्यास तीन लाख मुलांचा जीव वाचेल, असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. मात्र अद्याप ऑक्टोबर 2019 उजाडलेलं नाही. त्याला अद्याप 14 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं स्वच्छ भारत अभियान 100 टक्के यशस्वी ठरलं तर 3 लाख मुलांचा जीव वाचू शकेल, असं म्हटलं आहे. मात्र मोदींनी थेट 3 लाख मुलांचा जीव वाचला, अशी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ देत लाल किल्ल्यावरुन सव्वासो करोड भारतीयांना सांगितली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिवसRed Fortलाल किल्ला