शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी सर्वसामान्यांची गर्दी; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 12:22 IST

Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी आपल्या ९० मिनिटांच्या भाषणात मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

नवी दिल्ली : भारतात आज स्वांतत्र्यदिन (Independence Day 2023) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या सुमारे ९० मिनिटांच्या भाषणात त्यांनी मणिपूर हिंसाचारासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

विशेष म्हणजे, पुढील १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी आणि स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्य लोकांसह अनेक मान्यवर मंडळी लाल किल्ल्यावर उपस्थित होती. पोहोचले होते. नरेंद्र मोदी आपले भाषण संपल्यानंतर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली आले आणि थेट सर्वसामान्यांना सामोरे गेले. 

नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून ते आपल्या सुरक्षेची काळजी न करता उपस्थित सर्वसामान्य नागरिकांना भेटायला गेले. ज्यावेळी नरेंद्र मोदी लोकांसमोर होते, तेव्हाचे ते दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेऱ्या टिपले. कोणी नरेंद्र मोदींसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते, तर कोणी त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचा प्रयत्न करत होते. यावेळी नरेंद्र मोदींनी अनेक लोकांशी प्रेमाने हस्तांदोलन केले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींचे भाषण ऐकण्यासाठी १८ हजारांहून अधिक लोक लाल किल्ल्यावर पोहोचले होते. 

नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...- भ्रष्टाचाराच्या विरोधात अखंड लढणार आहे.  देशातून परिवारवाद उखडून लावणार आहे. लोकशाहीत परिवारवादी पक्ष ही विकृती आहे. परिवारवादामुळे विकासाला ब्रेक लागला आहे. - रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या माध्यमातून  दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्यासाठी नेशन फर्स्ट आणि राष्ट्र सर्वोपरी आहे. - आज भारतात महिला वैमानिकांची संख्या सर्वाधिक आहे. २ कोटी लखपती दीदींचे टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत. - देश नवनवे संकल्प घेऊन पुढे जात आहे. भारतात जास्तीत जास्त युवाशक्ती आहे, क्षमता देशाचे नशीब बदलते.- लोकशाहीच्या मजबुतीसाठी कुटुंबवादापासून मुक्तता आवश्यक आहे. कुटुंबवाद आणि घराणेशाही हे प्रतिभेचे शत्रू आहेत, क्षमता नाकारतात.-  विश्वकर्मा योजना विश्वकर्मा जयंतीला सुरू होणार असून त्यासाठी १३-१५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आमचे सरकार गरीबांसाठी समर्पित आहे.-  आज भारत जुनी विचारसरणी मागे टाकून पुढे जात आहे. ज्यांची पायाभरणी आमच्या सरकारने केली, त्यांचे उद्घाटनही करत आहे. - २०१४ पूर्वी देशभरातील राज्यांना केंद्र सरकारकडून ३० लाख कोटी रूपय दिले जायचे, मात्र आता १०० लाख कोटी रूपये दिले जातात.- डेमोग्राफी, डेमोक्रेसी आणि डायव्हर्सिटी भारताची ताकद आहे. 30 वर्षाखालील युवकांची सर्वाधिक संख्या फक्त भारताकडे आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन