शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मोदींचे 'जय किसान'; देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले २,००० रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 12:24 IST

येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

ठळक मुद्देयेत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान मोदींनी केला.केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती.२ हेक्टरपेक्षा कमी जागा असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत.

लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानं सर्व घटकांना खूश करण्याचा प्रयत्न केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार करताना दिसतंय. विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे, लोकार्पणाचे, उद्घाटनांचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जाताहेत. वेगवेगळ्या योजनांचीही अंमलबजावणी झटपट सुरू करण्यात येतेय. अशातच, येत्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारसाठी 'गेमचेंजर' ठरू शकणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ आज पंतप्रधान मोदींनी केला. या योजनेअंतर्गत देशातील १२ कोटी गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत २ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय. त्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे २ हजार रुपये मोदींनी पाठवले.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज गोरखपूरमधील खतनिर्मिती कारखान्याचं उद्घाटन होणार आहे. हा कारखाना १९९०-९१ मध्ये बंद पडला होता. त्यामुळे अनेक जण बेरोजगार झाले होते आणि शेतकऱ्यांचंही नुकसान होत होतं. तब्बल २५ वर्षं हा मुद्दा राजकारणात गाजत होता, पण कारखाना बंदच होता. २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी या कारखान्याचं भूमिपूजन करून पूर्वांचलमधील शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखवला होता. आता २०२० मध्ये या कारखान्यातून खतनिनर्मिती सुरू होणार आहे. आज याच कारखान्यात मोदी पूर्वांचलमधील शेतकऱ्यांना खतांचं वाटप करणार आहेत. त्याचवेळी त्यांनी किसान सन्मान योजनेचंही डिजिटल लाँचिंग केलं. 

केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. २ हेक्टरपेक्षा कमी जागा असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. या योजनेसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली, तरी या योजनेद्वारे 'जय किसान'चा नारा देत मोदींनी मतपेरणी केल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करून मोदी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी