शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी दलित वर्गासाठी देवा समान, केंद्रीय मंत्र्याकडून मोदींचं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 18:10 IST

शेखावत म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या 8 वर्षांच्या शासन काळात ज्या लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे, त्यांना मोदी देवासमाव वाटतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब आणि दलित वर्गासाठी देवता समान आहेत, असे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावात यांनी म्हटले आहे. शेखावत यांनी चित्तौडगड येथे "@20 सपने हुए साकार" मध्ये मोदी सरकारच्या योजनांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब आणि दलित वर्गासाठी देवासमान असल्याचे म्हटले आहे. 

शेखावत म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या 8 वर्षांच्या शासन काळात ज्या लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले आहे, त्यांना मोदी देवासमाव वाटतात. संमेलनात उपस्थित असलेले आदिवासी वर्गातून येणारे, अनुसूचित जमाती अथवा दलित समाजातील लोक मोदींना सन्मान मिळवून देणारे देव पुरुष म्हणून पाहू लागले असतील.

लोकांना वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली - पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री म्हणाले, विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिकांना पंतप्रधान मोदी वैज्ञानिक म्हणून अधिक वाटतात. तरुणांना स्टार्ट अपचे मार्गदर्शक तर ज्या लोकांना वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली, त्यांच्यासाठी मोदी एक साथी आहेत. एकूणच काय तर, ज्या लोकानी मोदींना ज्या रुपात बघितले मोदी त्यांना तसेच दिसून आले. 

याशिवाय, मंत्री शेखावत यांनी आपल्या भाषणात, आपल्या मंत्रालयासह केंद्री सरकारच्या विविध योजनांचीही माहिती दिली. तसेच, या योजनांमुळे लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे, असेही शेखावत म्हणाले. यापूर्वी शेखावत यांनी 'मोदी @20 सपने हुए साकार' पुस्तकाची तुलना भगवद्गीतेसोबत केली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRajasthanराजस्थान