शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, सास भी कभी बहू थी; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 16:55 IST

नरेंद्र मोदींनी विविध मुद्यावरुन मुलांसोबत गप्पा मारत अनेक आठवणी सांगितल्या.

नवी दिल्ली: देशभरातून 10 मुली आणि 12 मुले अशा एकूण 22 जणांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहे. याच पार्श्वभूमिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय शौर्य विजेत्या मुलांची भेट घेऊन यशस्वी जीवनाचा मंत्र दिला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या.

नरेंद्र मोदींनी विविध मुद्यावरुन मुलांसोबत गप्पा मारत अनेक आठवणी सांगितल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित असलेल्या एका मुलाने तुम्हाला आईची आठवण येत नाही का असा प्रश्व विचारला होता. यावर मला जेव्हा आईची आठवण येते तेव्हा माझा सर्व थकवा दूर होतो असं मोदींनी सांगितले. या प्रश्नोत्तरामध्ये नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना लोकप्रियता मिळालेल्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेचा उल्लेख केल्याने मुलांसोबत स्मृती इराणी यांना देखील हसू अनावर झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांसोबत संवाद साधताना मुलं देशाचे भविष्य असल्याचे सांगत पुढील वाटचालींसाठी मुलांना यशस्वी कानमंत्र दिला. तुमच्या शौर्याची गोष्ट ऐकून माझ्यासह प्रत्येकाला अभिमान असल्याचे यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच तुम्ही काही यश प्राप्त कराल, तेव्हा आपलं लक्ष्य काय आहे हे विसरू नका. संधीच्या शोधात राहा. मेहनत करण्यापासून अजिबात घाबरू नका, असा सल्ला देखील नरेंद्र मोदी यांनी उपस्थित असलेल्या मुलांना दिला. 

नरेंद्र मोदी यांनी मुलांना विविध प्रश्न विचारले. यामध्ये नरेंद्र मोदींनी मुलांना तुम्ही पाणी कसे पिता, उभे राहून की बसून असा प्रश्न विचारला होता. यावर काही मुलांनी उभे राहून तर काही मुलांनी बसुन पाणी पितो अशी उत्तरे दिली. मात्र नरेंद्र मोदी यांनी मुलांना पाणी उभं राहून न पिता बसुन पिण्याचे आवाहन केले. तसेच अनेकवेळा आई दूध घेऊन येते. त्यावेळी एखादं काम तिच्या हातात असतं किंवा टीव्ही मालिका सुरू असते. त्यामुळे आई मुलांना लवकरात लवकर दूध पिऊन घे असं सांगते. या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी उपस्थित असलेल्या मुलांना हो की नाही असं विचारल्यानंतर उपस्थितांकडून हो असे उत्तर आले. यानंतर मोदींनी कोणती मालिका 'सास भी कभी बहू थी' असा उल्लेख केल्याने स्मृती इराणींसह मुलांना हसू अनावर झाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSmriti Iraniस्मृती इराणीIndiaभारतBJPभाजपा