शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi: नरेंद्र मोदी किती वर्षे पंतप्रधानपदी राहणार? स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी केली मोठी भविष्यवाणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:17 IST

PM Narendra Modi: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी दावा केला की, ग्रह-नक्षत्रांच्या हिशोबाने पाहिले तर १२ वर्षांपर्यंत पीएम मोदी देशाचे प्रमुख राहतील.

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या कारकिर्दीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी दावा केला की, ग्रह-नक्षत्रांच्या हिशोबाने पाहिले तर १२ वर्षांपर्यंत पीएम मोदी देशाचे प्रमुख राहतील. राष्ट्रवादाच्या नावावर पंतप्रधाननरेंद्र मोदी स्वत: पंतप्रदानपदाचा त्याग करतील आणि योग्य व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवतील. तसेच योगी आदित्यनाथ हे मोदींचे उत्तराधिकारी असतील, असा दावाही त्यांनी केला.

महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी भविष्यवाणी केली की, मोदीजी १२ वर्षांच्या शासनकाळानंतर स्वत:च पंतप्रधानपदाचा त्याग करतील. तसेच राष्ट्रवादाच्या नावाने जी व्यक्ती देशाला चांगल्या पद्धतीने चालवण्यात सक्षम असेल, त्या व्यक्तीकडे देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सोपवतील. तसेच ते राजकारणाचा त्याग करून एक आदर्श प्रस्थापित करतील.

महोबामध्ये स्वजन शिष्य संमेलन कार्यक्रमादरम्यान, त्यांनी पुढे सांगितले की, आमचा आशीर्वाद आहे की, मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानंतर योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीची सत्ता सांभाळावी. त्यांनी पंतप्रधान बनून हिंदू राष्ट्रवादाचे स्वप्न पूर्ण करावे. उत्तर प्रदेशमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा इतिहास रचला आहे. तसेच राजकीय वर्तुळामध्ये त्यांना भाजपाचे भविष्यातील पीएम मटेरियल म्हणून पाहिले जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतPoliceपोलिस