शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi : "अत्याचार, विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे TMC, गरिबांची लूट केली"; मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 14:34 IST

Narendra Modi And Mamata Banerjee : एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, टीएमसी हे अत्याचाराचं दुसरं नाव आहे. TMC म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी बंगाल दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कृष्णनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, "टीएमसी हे अत्याचाराचं दुसरं नाव आहे. TMC म्हणजे विश्वासघात, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. टीएमसीने गरिबांची लूट केली आहे. ममता बॅनर्जींच्या टीएमसीला लोकांना गरीब ठेवायचे आहे. त्यामुळे पश्चिम बंगालचा विकास होणं आवश्यक आहे. मोदींनी पश्चिम बंगालला पहिलं एम्स दिलं आहे."

जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हणाले की, "ही भूमी भगवान कृष्णाच्या भक्तीचे सर्वोच्च प्रचारक चैतन्य महाप्रभू यांची जन्मभूमी आहे. चैतन्य महाप्रभूंच्या चरणी नतमस्तक होतो. हे माझे सौभाग्य आहे की काही दिवसांपूर्वीच मला समुद्राच्या खोल पाण्यात जाऊन भगवान श्रीकृष्णाच्या प्राचीन भूमीला, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या द्वारका नगरीला नमन करण्याचं भाग्य लाभले."

"एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण इथे जमलेले पाहून 'एनडीए सरकार, 400 पार' हे सांगण्याचा आत्मविश्वास मला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये हा माझा दुसरा दिवस आहे. गेल्या 2 दिवसात मला बंगालसाठी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. यामुळे गुंतवणूक येईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि शेजारच्या भागावर परिणाम होईल. मात्र, तृणमूल सरकारने बंगालच्या जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, हे मान्य करावे लागेल. लोकांची ते सतत फसवणूक करत आहेत."

"बंगालमध्ये ज्या प्रकारे टीएमसी सरकार चालवत आहे, त्यामुळे बंगालची निराशा झाली आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने टीएमसीला एवढा मोठा जनादेश वारंवार दिला आहे, पण टीएमसी हे अत्याचार आणि विश्वासघाताचे दुसरं नाव झालं आहे. तृणमूल काँग्रेससाठी बंगालचा विकास नसून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला प्राधान्य आहे" असं मोदींनी म्हटलं आहे. सभेला संबोधित करण्यापूर्वी त्यांनी एका सरकारी कार्यक्रमादरम्यान पश्चिम बंगालमध्ये 15,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस