पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी पंतप्रधानांनी संबोधित करताना देशवासीयांना विश्वास देत लवकरच भारतातही कोरोनावरील लसीला मंजुरी देण्यात येणार असल्याचं म्हटलं. तसंच जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी तयारीही केली जात असल्याचे ते म्हणाले. तसंच आरोग्याच्या बाबतीत २०२० हे एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. २०२० मध्ये महासाथीच्या प्रादुर्भाव वाढण्याची चिंता होती. चहुबाजूंनी प्रश्न उपस्थित होत होते. परंतु २०२१ हे नवं वर्ष उपचाराची आशा घेऊन येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकसित केल्या जात असलेल्या लसीबाबत आवश्यक ती तयारी सुरू असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. "कोरोनाच्या लसीबाबत देशात आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतात विकसित होणारी लस ही जलदगतीनं सर्वांपर्यंत पोहोचेल यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहीम राबवण्यासाठीही तयारी केली जात आहे. ज्या प्रकारे संक्रमण थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न केले तसं लसीकरणाची मोहिमही यशस्वी करण्यासाठी भारत एकत्र होऊन पुढे येईल," असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी भारताची तयारी सुरु : पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 12:09 IST
PM Narendra Modi : भारतातही लवकरच कोरोनाच्या लसीला मंजुरी देण्यात येणार असून जगातील सर्वात व्यापक लसीकरण मोहीम राबवण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेसाठी भारताची तयारी सुरु : पंतप्रधान
ठळक मुद्देगुजरातच्या राजकोटमध्ये उभारल्या जाणाऱ्या एम्स रुग्णालयाचं भूमिपूजन केलं.जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी तयारीही केली जात असल्याची पंतप्रधानांची माहिती