शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Coronavirus: जगभरात कसा पसरला कोरोना? मोदींनी सांगितलेली आकडेवारी पाहून छाती दडपून जाईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 8:49 PM

Coronavirus पंतप्रधान मोदींनी सांगितली कोरोनाबद्दलची जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. स्वत:ला वाचवण्यासाठी, कुटुंबीयांना वाचवण्यासाठी आणि देशाला वाचवण्यासाठी पुढील २१ दिवस घरात राहा. बाहेर पडू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. या परिस्थितीत संपूर्ण देश एक म्हणून उभा आहे. २१ दिवसांचा कालावधी मोठा आहे. मात्र आपण निश्चितपणे कोरोनावर विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोनाची लक्षणं दिसायला लागणारा कालावधी आणि कोरोनाचा विषाणू संक्रमित होण्याचा वेग या संदर्भातील काही आकडेवारी पंतप्रधान मोदींनी दिली. 'जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची लक्षणं दिसायला काही दिवसांचा कालावधी जातो. त्या दिवसांमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीनं अनेकांना संक्रमित केलेलं असतं. कोरोनाची बाधा झालेली एक व्यक्ती एवघ्या आठवड्याभरात शेकडो लोकांपर्यंत विषाणू पसरवते,' असं मोदींनी सांगितलं.कोरोनाबाधितांची संख्या किती झपाट्यानं वाढते, याची माहितीदेखील मोदींनी दिली. 'जगात कोरोना संक्रमितांची संख्या १ लाखावर जायला ६७ दिवस लागले होते. मात्र हीच संख्या १ ते २ लाखांवरुन अवघ्या ११ दिवसांत पोहोचली. यानंतरचे एक लाख रुग्ण आढळून येण्यासाठी, म्हणजेच रुग्णांची संख्या २ लाखांवरुन ३ लाखांवर जायला केवळ ४ दिवसांचा कालावधी लागला. यातून कोरोना किती वेगानं फोफावतोय, याची कल्पना करा,' अशा शब्दांत मोदींनी देशवासीयांना पुढील २१ दिवस घरातच राहण्याचं आवाहन केलं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना