शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा मित्र मनरेगाचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाला- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 13:40 IST

मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे.

चंद्रपूर: नीरव मोदी व मेहुल चोक्सी हे दोघे नरेंद्र मोदींचे चांगले मित्र आहेत. हे दोघेही मनरेगा योजनेचा एका वर्षाचा पैसा घेऊन पळाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते बुधवारी चंद्रपूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार गरिबांच्या खिशातून पैसे काढून श्रीमंतांना देत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरव मोदीला 35 हजार कोटी दिले. हेच 5 कोटी दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधकांना दिले असते तर मोठ्याप्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली असती, असे राहुल यांनी म्हटले.जर सरकार उद्योगपतींना मदत करेल असेल तर, त्यांनी शेतकऱ्यांनादेखील मदत करायला हवी. शेतकऱ्यांचे रक्षण होऊ शकेल, इतका पैसा सरकारकडे नक्कीच आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही तो पैसा नक्कीच शेतकऱ्यांच्या खिशात टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेतही मोदी सरकार फक्त श्रीमंतांच्या भल्यासाठी काम करत असल्याची टीका केली. केंद्रातील मोदी सरकार केवळ श्रीमंतांसाठी काम करतेय. गरीबांच्या खिशातील पैसा श्रीमतांच्या खिशात ओतला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पुढे ते असंही म्हणालेत की, मनमोहन सिंग सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होते. आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. म्हणजेच दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होत नाही. हा पैसा कुठे जातोय?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणा, अशी मागणीही राहुल यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस