शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: भाजपा खासदारांच्या बैठकीत नरेंद्र मोदी भावूक; देशाबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 12:12 IST

Narendra Modi: दिल्ली हिंसाचारानंतर पहिल्यांदा २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं होतं.

ठळक मुद्देदेशात शांतता आणि एकता गरजेची आहे.विकास भाजपाचा मंत्र आहे. त्यासाठी शांतता आणि सद्भावना गरजेचे आहेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं भाजपा खासदारांना मार्गदर्शन

नवी दिल्ली - सीएएच्या मुद्द्यावरुन देशाच्या राजधानी दिल्लीत गेल्या आठवडाभरापासून हिंसाचार पेटला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ४० हून अधिक लोकांचा जीव गेला. अनेकांची घरे जाळण्यात आली, दुकाने लुटली, दंगल पेटवण्यात आली. या संपूर्ण प्रकारावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारला घेरण्यात येत आहे. 

सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. हिंसाचार भडकवण्यामागे सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरली, अनेक अफवांमुळे दिल्लीतील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येतात. सोमवारी अचानक नरेंद्र मोदींनी ट्विट केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. अशातच आज भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसाचाराच्या घटनेवरुन भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

या बैठकीला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात शांतता आणि एकता गरजेची आहे. सबका साथ-सबका विकास करत असताना सबका विश्वासही महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी सर्वात पहिलं माझा देश महत्त्वाचा आहे त्यानंतर पक्ष आहे असं त्यांनी सांगितले. तसेच देश सर्वोच्च आहे. विकास भाजपाचा मंत्र आहे. त्यासाठी शांतता आणि सद्भावना गरजेचे आहे. विकास पुढे घेऊन जायचा आहे. फक्त बोलू नका तर प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावना राखण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना दिली. 

दिल्ली हिंसाचारानंतर पहिल्यांदा २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर भाष्य केलं होतं. तब्बल ६९ तासांनंतर आलेल्या या ट्विटमुळे पंतप्रधान मोदींवर विरोधकांनी टीकाही केली. लोकांना शांतता राखण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं होतं. या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, दिल्लीच्या विविध भागातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा कार्यरत आहेत. त्यामुळे सर्वांनी शांतता व बंधुता टिकवून ठेवण्याचं काम करावं अशी विनंती त्यांनी केली होती. 

दरम्यान, सोमवारी अचानक मोदींनी टि्वटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार करत आहे. याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं म्हटलं, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi violenceदिल्लीBJPभाजपा