शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

पंतप्रधान मोदी 5 वर्षे कसं चालवणार सरकार? 'योग वाली सरकार' म्हणत बाबा रामदेव स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:19 IST

संपूर्ण देशभरात शुक्रवारी (२१ जून २०२४) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी तयारीही सुरू आहे. 

हे 'योगाचे सरकार' आहे. यावेळी सरकारला संतुलितपणेच चालावे लागेल. पंतप्रधान मोदींना सर्वांना सोबत घेऊन चालता येते आणि ते संपूर्ण पाच वर्ष सरकार चालवतील, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशभरात शुक्रवारी (२१ जून २०२४) आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. यासंदर्भात विविध ठिकाणी तयारीही सुरू आहे. 

योग दिवसाच्या एक दिवस आधी योग गुरु बाबा रामदेव यांनी एबीपी न्यूजसोबत योग बरोबरच राजकारणासंदर्भातही संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीत जय-परायज होतच असतो. कुणाचा जय होईल तर कुणाचा पराजय. मात्र आपण विरोधकांच्या भूमिकांचाही सन्मान करायला हवा. असे झाल्यास वैचारिक लोकशाही होईल.  

"संपूर्ण ५ वर्षं सरकार चालवतील पंतप्रधान मोदी" -२०१४ आणि २०१९ मध्ये एकट्या भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. मात्र यावेळी संपूर्ण एनडीए मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. यावेळी स्पष्ट बहुमत नसल्याने संतुलितपणे चालावे लागेल, असे बोलले जात आहे, असे विचारले असता बाबा रामदेव म्हणाले, हे योगाचे सरकार आहे. यावेळी सरकारला संतुलन ठेऊनच चालावे लागेल. पंतप्रधान मोदींना सर्वांना सोबत घेऊन चालता येते. ते संपूर्म पाच वर्ष सरकार चालवतील.

नितीश कुमारांचंही कौतुक - यावेळी, बाबा रामदेव यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, माध्यमांनी त्यांची छबी पलटूराम अशी केली आहे. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि आता भाजपसोबत आहेत आणि भाजप सोबतच राहतील. ते कुठेही जाणार नाहीत. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार