कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 11:07 AM2022-01-11T11:07:29+5:302022-01-11T11:10:55+5:30

PM Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील.

PM Narendra Modi calls for meeting with CMs on Covid response | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक!

Next

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 4 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 68 हजार 63 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 69 हजार 959 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशात पुन्हा कोरोना वाढत असून सामान्य नागरिक, आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक, संसदेचे कर्मचारी, न्यायालयाचे कर्मचारी आणि न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईतही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे देशातील नागरिकांच्या लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे. 

शनिवारी झालेल्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी कोरोनासंदर्भात काय म्हणाले?
गेल्या शनिवारी कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. आरोग्य संबंधित विषयांवरील उपाययोजना तसेच लसीकरणाची तयारी, 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत आढावा घेतला. कोरोना आरोग्य सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टेलीमेडिसिनची सुविधा वाढवावी असे पंतप्रधान म्हणाले आहेत. देशातील कोरोना संबंधी समस्यांवर निराकरण करण्यासाठी टेलीमेडिसिन सुविधा उपयुक्त ठऱेल, रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.

Web Title: PM Narendra Modi calls for meeting with CMs on Covid response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.