नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचं सुरू असलेलं थैमान, देशात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी आज संवाद साधला. येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू' करण्यात यावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजता जनता कर्फ्यू पाळण्यात यावा, असं मोदींनी म्हटलं. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत, याची तपासणी 'जनता कर्फ्यू'च्या माध्यमातून करूया, अशी साद त्यांनी घातली.
Coronavirus: येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू'; पंतप्रधान मोदींची जनतेला साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 20:41 IST
Coronavirus: पंतप्रधान मोदींचा देशवासीयांशी संवाद; येत्या रविवारी 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन
Coronavirus: येत्या रविवारी दिवसभर देशभरात 'जनता कर्फ्यू'; पंतप्रधान मोदींची जनतेला साद
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासीयांशी संवाद२२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहनजनतेसाठी जनतेनं कर्फ्यू पाळावा; मोदींची देशवासीयांना साद