शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 10:46 IST

शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिवजयंतीनिमित्त आपल्या ट्विटर अकाऊंटवरील संदेशाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना वाहिली. मोदींनी एक व्हिडीओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त एक महत्त्वाचा संदेशही दिला आहे. शिवाजी महाराजांसारखे शूर आणि महान व्यक्तीमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान आहे. शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही, असे मोदींनी या व्हिडीओत म्हटले आहे. तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेला एक आवाहनही केले आहे. त्यासाठी मोदींच्या पूर्वीच्या भाषणांचा संदर्भ वापरण्यात आला आहे. दरदिवशी प्रत्येक भारतीयाने किमान एका व्यक्तीची सेवा करावी, तरच या सेवेच्या माध्यमातून आपण महाराजांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करु शकतो, असं ते एका भाषणात म्हणाले होते. याशिवाय, मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान  ‘जय भवानी जय शिवाजी’ केलेल्या जयघोषाचाही व्हिडीओमध्ये कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. आज शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शासकीय कार्यक्रमांसह अनेक संस्थांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान, कोल्हापूरमध्ये एका दुर्देवी घटनेमुळे शिवप्रेमींच्या उत्साहावर विरजण पडले आहे.  शिवजयंतीनिमित्त सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील विद्यार्थी पन्हाळ्याकडून सांगलीकडे शिवज्योत घेऊन चालले होते. त्यावेळी त्यांच्या ट्रकला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू  झाला.  

टॅग्स :Shivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Narendra Modiनरेंद्र मोदी