शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'काळे कपडे घालून काळीजादू करण्याचा प्रयत्न, पण...', PM नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 18:06 IST

'देशातील काही लोक नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही.'

PM Modi Attacks Congress: तपास यंत्रणांचा गैरवापर आणि केंद्र सरकारच्या विविध धोरणांविरोधात काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी काळे कपडे घालून आपला विरोध दर्शवला होता. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी 5 ऑगस्टला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराची पायाभरणी झाली होती.

'काँग्रेसने काळी जादू केली'काँग्रेसच्या आंदोलनावर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 'देशातील काही लोक नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत, निराशेच्या गर्तेत बुडाले आहेत. सरकार विरोधात खोटं बोलत असल्यामुळे जनता जनार्दनदेखील अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा नैराश्यात हे लोकही आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत.' 'लोकांचा यांच्यावर विश्वास नाही''या लोकांकडून काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला, हे आपण 5 ऑगस्ट रोजी पाहिलं आहे. या लोकांना असे वाटते की काळे कपडे घातल्याने त्यांची निराशा संपेल. पण त्यांना हे माहीत नाही की, त्यांनी कितीही काळी जादू केली, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर कधीच निर्माण होणार नाही.' अशी जोरदार टीका मोदींनी केली.देशाला बदनाम करण्याचा प्रयत्नमोदी पुढे म्हणतात की, 'देशाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देश तिरंग्याच्या रंगात रंगला आहे. पण, या पवित्र सोहळ्याला बदनाम करण्याचा, आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा लोकांची मानसिकता समजून घेणे गरजेचे आहे.' यावेळी मोदींनी आम आदमी पार्टीचे नाव न घेता निशाणा साधला. 'स्वार्थ असेल तर कोणीही पेट्रोल-डिझेल मोफत देण्याची घोषणा करू शकते. अशी पावले आपल्या मुलांकडून त्यांचे हक्क हिरावून घेतील, देशाला स्वावलंबी होण्यापासून रोखतील. अशा स्वार्थी धोरणांमुळे देशातील प्रामाणिक करदात्याचा भारही वाढणार आहे,' असा घणघात त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस