शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:26 IST

केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

नवी दिल्ली  -  केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने जाहीर केलेली न्याय योजना पसंत पडल्याने युवक तसेच ज्येष्ठ नागरिकही लोकसभा निवडणुकांत आम्हालाच मतदान करत आहेत. देशातील गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी न्याय योजना अतिशय परिणामकारक ठरणार असल्याचे त्यांना मनोमन पटले आहे.देशातील सर्वात गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपयांचे किमान हमी उत्पन्न देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाने आपल्या न्याय योजनेच्या माध्यमातून दिले आहे. ‘अब होगा न्याय’, असे घोषवाक्य असलेली प्रचारमोहीम लोकसभा निवडणुकांत या पक्षाने गेल्या महिन्यापासून राबविली आहे.‘चौकीदार चोर है' विषयीभिंड : ‘चौकीदार चोर है' ही घोषणा मी किंवा काँग्रेसने तयार केलेली नाही. युवक, शेतकरी, मजूर यांनीच मोदी सरकारची खिल्ली उडविण्यासाठी ही घोषणा तयार केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. जाहीर सभेत त्यांनी चौकीदार चोर है या घोषणेचा उगम कसा झाला याचा किस्सा सांगितला. दोन कोटी रोजगार निर्माण करीन, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशी आश्वासने चौकीदाराने (नरेंद्र मोदी) दिल्याचा उल्लेख आपण छत्तीसगडमधील सभेत करताच श्रोत्यांपैकी दहा-पंधरा युवकांनी ‘चौर है' असा प्रतिसाद दिला. ते काय म्हणाले हे पहिल्यांदा नीट ऐकू न आल्याने आपण पुन्हा विचारले असता ते युवक जोरात म्हणाले की ‘चौकीदार चोर है'. त्यानंतर ही घोषणा जनमानसात पसरली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी