शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेकडे भाजपाच्या खासदारांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2018 17:29 IST

मोदींच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकाऱ्यांचं योजनेकडे साफ दुर्लक्ष

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेत भाजपा खासदारांनाच फारसा रस नसल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं आहे.  विशेष म्हणजे मोदींच्या कॅबिनेटमधील बहुतांश मंत्र्यांनीदेखील ही योजना गांभीर्यानं घेतलेली नाही. या योजनेअंतर्गत खासदारांनी एक गाव दत्त घेऊन त्याचा संपूर्ण विकास करणं अपेक्षित होतं. मात्र बहुतांश खासदारांनी या योजनेकडे दुर्लक्ष केलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांची संख्या विचारात घेतल्यास 78 टक्के खासदारांनी अद्याप गावदेखील दत्तक घेतलेलं नाही. नुकताच जागतिक पर्यावरण दिवस साजरा दिला. त्यानिमित्तानं मोदी सरकारनं एक अहवाल जाहीर केला. हा अहवाल पर्यावरणाच्या स्थितीवर आधारित होता. मोदी सरकारमधील 10 पेक्षा अधिक वरिष्ठ मंत्र्यांनी खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गाव दत्तक घेतलं नसल्याचं या अहवालातून समोर आलं. यामध्ये नितीन गडकरी, सदानंद गौडा, अनंत गीते, प्रकाश जावडेकर, अरुण जेटली, रविशंकर प्रसाद, अनंत कुमार, स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत, धर्मेंद्र प्रधान आणि चौधरी बिरेंद्र सिंह यांच्यासह एकूण 23 मंत्र्यांचा समावेश आहे. तीन वर्षांपूर्वी मोदींनी जाहीर केलेली खासदार आदर्श ग्राम योजना आता तिसऱ्या टप्प्यात आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकूण 786 पैकी 703 खासदारांनी गाव दत्तक घेतलं होतं. दुसऱ्या टप्प्यात हा आकडा 466 वर आला. तिसऱ्या टप्प्यात तर हा आकडा आणखी खाली आला. तिसऱ्या टप्प्यात तब्बल 78 टक्के खासदारांनी या योजनेकडे पाठ फिरवली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीSuresh Prabhuसुरेश प्रभूSmriti Iraniस्मृती इराणीPrakash Javadekarप्रकाश जावडेकर